काही काळ वाहतूक खोळंबली
मुळवी वाडा येथे रस्त्यावर कोसळलेले मोठे आंब्याचे झाड.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
फोंडा : मुळवीवाडा गावणे येथे भर रस्त्यावर आंब्याचे मोठे झाड पडल्याने काही काळ वाहतूक खोळंबली. झाड कोसळल्याने एका गॅरेजचे नुकसान झाले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सदर झाड एका गॅरेजवर पडले. त्यामुळे गॅरेजचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने झाड पडले त्यावेळी रस्त्यावर कोणीही नसल्याने कोणालाही इजा झाली नाही. फोंडा अग्निशामक दलाच्या जवानांनी झाड पडलेल्या ठिकाणी धाव घेऊन झाड कापून रस्ता मोकळा केला. सदरचे झाड मोठे असल्याने काही काळ वाहतूक खोळंबली.