पणजी : मच्छीमार संचालनालयाकडून 'व्हाईट लेग्ड श्रिम्प' विक्रीसाठी उपलब्ध

'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर विक्री

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
11th July, 04:13 pm
पणजी : मच्छीमार संचालनालयाकडून 'व्हाईट लेग्ड श्रिम्प' विक्रीसाठी उपलब्ध

पणजी : गोवा सरकारच्या मत्स्य संचालनालयाच्या पुढाकाराने धावजी-जूने गोवे येथे ईस्टूराईन फिश फार्ममधील खारफुटी भागातील मत्स्यपालन प्रकल्पांतर्गत व्हाईट लेग्ड श्रिम्प (White Legged Shrimp - Litopenaeus vannamei) या जातीच्या कोळंबीच्या उत्पादनाच्या पायलट प्रकल्पाची सुरुवात केली आहे.




या प्रकल्पांतर्गत मिळालेली कोळंबी आज ११ जुलै २०२५ रोजी दुपारी २.३० वाजल्यापासून विक्रीसाठी पणजी येथील मच्छिमार संचालनालय कार्यालयात उपलब्ध करण्यात आली आहे. कोळंबीची विक्री 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर होत असून, दिवसभरातील साठा संपेपर्यंत ही सुविधा सुरु राहणार आहे. ही कोळंबी ३५०प्रति किलो या दराने विकली जात आहे.  मच्छिमार संचालनालयाजवळ नागरिकांनी सकाळी ११ वाजल्यापासूनच गर्दी करायला सुरुवात केली होती.   

हेही वाचा