राज्यात ५२ दिवसात ७५ इंच पावसाची नोंद

धारबांदोडा केंद्रात सर्वाधिक ७५.९० इंच पावसाची नोंद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th July, 04:03 pm
राज्यात ५२ दिवसात ७५ इंच पावसाची नोंद

पणजी : सध्या राज्यातील मान्सून कमजोर झाला आहे. असे असले तरी अधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. राज्यात १ जून ते ११ जुलै दरम्यान सरासरी ५०.०४ इंच पावसाची नोंद झाली आहे. वरील कालावधीत राज्यातील १४ पैकी ६ केंद्रात पावसाने पन्नास इंचाची सरासरी पूर्ण केली आहे. आतापर्यंत धारबांदोडा केंद्रात सर्वाधिक ७५.९० इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात २० मे ते ११ जुलै दरम्यान सरासरी ७५.१४ इंच पावसाची नोंद झाली आहे.

 
राज्यात शुक्रवारी ऊन पावसाचा खेळ 
हवामान खात्याने १३ ते १५ जुलै दरम्यान मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यानुसार या तीन दिवसांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर १२, १६ व १७ जुलै दरम्यान तुरळक स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने कोणताही अलर्ट देण्यात आला नाही. चोवीस तासात पणजीत कमाल ३१.७ इंच तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

राज्यात पुढील पाच दिवस कमाल तापमान ३१ अंश तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. गुरुवारी मुरगाव मधील कमाल तापमान ३०.२ अंश तर किमान तापमान २५.६ अंश सेल्सिअस राहीले. राज्यात चोवीस तासांत सरासरी ०.७७ इंच पावसाची नोंद झाली. यादरम्यान केपेत १.४९ इंच, धारबांदोडात १.२७ इंच, साखळीत १.१६ इंच पावसाची नोंद झाली.

 
राज्यात १ जून ते ११ जुलै दरम्यान पाऊस
केंद्र - पाऊस (इंचात)

धारबांदोडा/  ७५.९०
वाळपई / ६२.५७
सांगे / ६३.१४
फोंडा / ५७.९१
केपे / ५५.५५
साखळी /५४.२०
जूने गोवे /४८.९०
काणकोणमध्ये /४६.५४
पेडणे/ ४५.१४
पणजीत/ ४४.५७
म्हापसा /४०.३४
मडगाव /३८.६१
दाबोळीत /३४.०७
मुरगाव /३१.३१

हेही वाचा