फोंडा : क्रिप्टो गुंतवणुकीमध्ये चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवत शिरोडा येथील राजीव गुप्ता यांना दोघांनी सुमारे ३ लाख ९० हजार रुपयांचा गंडा घातला.
जानवी व राजेश नामक दोघांनी राजीव गुप्ता यांना मोबाईलवरून संपर्क साधला. क्रिप्टो मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळण्याचे त्यांना आमिष दाखवले. त्यानुसार गुप्ता यांनी ३ लाख ९० हजार रुपये त्यांच्या योजनेत गुंतवले. सुरुवातीला त्यांना ५५ हजार रुपये देण्यात आले. मात्र, नंतर उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली. त्या दोघांनी नंतर संपर्क बंद केला. आपण फसवले गेलो याची जाणीव होताच गुप्ता यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यासंबंधी पुढील तपास करीत आहेत.