अ - अननस

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
15 hours ago
अ - अननस

अगदी बालवाडीपासून ज्या फळाची आपल्याला ओळख झाली ते अननस. अननसाला संस्कृत भाषेत ‘बहुनेत्र’ असे म्हटले जाते. आंबट गोड असे अननस पावसाळ्यात खायला मज्जा येते. अननसाच्या फोडी त्यावर थोडीशी मिरपूड भुरभुरवून खाल्ल्या तर जीभेची चव वाढवतात.

अननसाचे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तुमच्या आईने आणि आजीने बनवलेले तुम्ही खाल्ले असतीलंच. अननसाचा रस, हलवा, मुरंबा, अननस शिरा, अननसाचा केक, अननसाची आमटी म्हणजेच सांसव  असे विविध चविष्ट प्रकार आहेत. यांपैकी तुम्ही कोणकोणते पदार्थ खाल्ले आहेत आठवा बरं... 

कच्च्या अननसाचा रस पोटातील जंत कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. 

पिकलेले अननस खाल्ले असता शरीरातील उष्णता कमी होते, लघवी साफ होते. 

अननस हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सुद्धा मदत करते. 

असे हे आरोग्यासाठी उपयोगी असलेले अननस अजून तुम्ही खाल्ले नसेल तर लवकरच आंबट - गोड असे अननस आणून खायला सुरुवात करा. आणि हं अननस खाल्ल्याने नैसर्गिक व्हिटॅमिन सी सुद्धा मुबलक प्रमाणात मिळते. त्यामुळे नक्की या ऋतूत त्याचा फायदा घ्या.


वैद्य कृपा नाईक,
आयुर्वेदाचार्य