महिला विश्वचषक २०२५ चे वेळापत्रक जाहीर : ३० सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात
दुबई : आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक अखेर जाहीर झाले असून, भारत-पाकिस्तान सामना या स्पर्धेतील सर्वात मोठे आकर्षण ठरणार आहे. महिला क्रिकेटमध्ये वाढती लोकप्रियता पाहता, भारतात होणाऱ्या या वर्ल्डकपकडे साऱ्या जगाचे लक्ष लागलेले आहे. मात्र भारत-पाकिस्तान हा बहुचर्चित सामना भारतात नव्हे, तर श्रीलंकेतील कोलंबो येथे ५ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे.
त्यामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पाकिस्तानविरूद्ध होणाऱ्या सामन्यासाठी कोलंबोला जावे लागणार आहे. तर पाकिस्तानचे सर्व सामने कोलंबोत खेळवले जाणार आहेत.या स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलचा सामना २९ ऑक्टोबरला गुवाहाटी किंवा कोलंबोत खेळवला जाऊ शकतो. जर पाकिस्तानने स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये प्रवेश केला तर कोलंबोत खेळवला जाईल. मात्र, पाकिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचू शकला नाही, तर हा सामना गुवाहाटीमध्ये खेळवला जाईल. या स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलचा सामना ३० ऑक्टोबरला बंगळुरूत खेळवला जाईल. तसेच या स्पर्धेतील फायनलचा सामना २ नोव्हेंबरला खेळवला जाईल. जर पाकिस्तानने फायनलमध्ये प्रवेश केला, तर हा सामना कोलंबोत खेळवला जाईल. जर पाकिस्तानचा संघ फायनलमध्ये प्रवेश करू शकला नाही, तर हा सामना बंगळुरूत खेळवला जाईल.
महिला वनडे विश्वचषक २०२५ स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक
मंगळवार, ३० सप्टेंबर, भारत-श्रीलंका, बंगळुरु : दुपारी ३ वाजता
बुधवार, २ ऑक्टोबर, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड, इंदुर : दुपारी ३ वाजता
गुरुवार, २ ऑक्टोबर , बांगलादेश-पाकिस्तान, कोलंबो : दुपारी ३ वाजता
शुक्रवार, ३ ऑक्टोबर, इंग्लंड-दक्षिण आफ्रिका, बंगळुरु : दुपारी ३ वाजता
शनिवार, ४ ऑक्टोबर, ऑस्ट्रेलिया-श्रीलंका, कोलंबो : दुपारी ३ वाजता
रविवार, ५ ऑक्टोबर, भारत-पाकिस्तान,कोलंबो : दुपारी ३ वाजता
सोमवार, ६ ऑक्टोबर, न्यूझीलंड-दक्षिणआफ्रिका,इंदुर : दुपारी ३ वाजता
मंगळवार, ७ ऑक्टोबर, इंग्लंड-बांगलादेश, गुवाहाटी : दुपारी ३ वाजता
बुधवार, ८ ऑक्टोबर, ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान,कोलंबो : दुपारी ३ वाजता
गुरुवार, ९ ऑक्टोबर , भारत - दक्षिण आफ्रिका, विशाखापट्टणम : दुपारी ३ वाजता
शुक्रवार, १० ऑक्टोबर, न्यूझीलंड-बांगलादेश, विशाखापट्टणम : दुपारी ३ वाजता
शनिवार, ११ ऑक्टोबर, इंग्लंड-श्रीलंका, गुवाहाटी : दुपारी ३ वाजता
रविवार, १२ ऑक्टोबर, भारत-ऑस्ट्रेलिया,विशाखापट्टणम : दुपारी ३ वाजता
सोमवार, १३ ऑक्टोबर, दक्षिण आफ्रिका-बांगलादेश, विशाखापट्टणम : दुपारी ३ वाजता
मंगळवार, १४ ऑक्टोबर, न्यूझीलंड-श्रीलंका,कोलंबो : दुपारी ३ वाजता
बुधवार, १५ ऑक्टोबर, इंग्लंड-पाकिस्तान, कोलंबो : दुपारी ३ वाजता
गुरुवार, १६ ऑक्टोबर, ऑस्ट्रेलिया-बांगलादेश,विशाखापट्टणम : दुपारी ३ वाजता
शुक्रवार, १७ ऑक्टोबर, दक्षिण आफ्रिका-श्रीलंका, कोलंबो : दुपारी ३ वाजता
शनिवार, १८ ऑक्टोबर, न्यूझीलंड-पाकिस्तान, कोलंबो : दुपारी ३ वाजता
रविवार, १९ ऑक्टोबर, भारत-इंग्लंड, इंदुर : दुपारी ३ वाजता
सोमवार, २० ऑक्टोबर, श्रीलंका-बांगलादेश, कोलंबो : दुपारी ३ वाजता
मंगळवार, २१ ऑक्टोबर, दक्षिण आफ्रिका-पाकिस्तान, कोलंबो : दुपारी ३ वाजता
बुधवार, २२ ऑक्टोबर, ऑस्ट्रेलिया-इंग्लंड, इंदुर : दुपारी ३ वाजता
गुरुवार, २३ ऑक्टोबर, भारत-न्यूझीलंड, गुवाहाटी : दुपारी ३ वाजता
शुक्रवार, २४ ऑक्टोबर, पाकिस्तान-श्रीलंका, कोलंबो : दुपारी ३ वाजता
शनिवार, २५ ऑक्टोबर, ऑस्ट्रेलिया-श्रीलंका, इंदुर : दुपारी ३ वाजता
रविवार, २६ ऑक्टोबर, इंग्लंड-न्यूझीलंड, गुवाहाटी : दुपारी ३ वाजता
रविवार, २६ ऑक्टोबर, भारत-बांगलादेश, बंगळुरू : दुपारी ३ वाजता
बुधवार, २९ ऑक्टोबर, सेमीफायनल १ (निर्धारित) गुवाहाटी/कोलंबो : दुपारी ३ वाजता
गुरुवार, ३० ऑक्टोबर, सेमीफायनल २ (निर्धारित) बंगळुरू : दुपारी ३ वाजता
रविवार, २ नोव्हेंबर फाइनल (निर्धारित) कोलंबो/बंगळुरू : दुपारी ३ वाजता