केसरी ग्लोबल एक्वेरियम

Story: माझी डायरी |
6 hours ago
केसरी ग्लोबल एक्वेरियम

माझी आई, काकी, आत्या, आत्याचा मुलगा, आत्याची मुलगी व माझा भाऊ गेले होतो फिरायला... कुठे माहीत आहे का? आम्ही गेलो होतो केसरी ग्लोबल एक्वेरियमला. १८ मे ला सकाळी नऊ वाजता घरातून बाहेर पडलो. मग आम्ही माझ्या आत्याला व माझ्या बहिणीला आणायला गेलो. माझ्या आत्याच्या मुलीचं नाव मयुरी आहे. मी तिला मयू दीदी म्हणते. 

आम्ही माझ्या गावाकडनं तिथे एक तासात पोहोचलो. त्यांना घेऊन आम्ही एक्वेरियमला एक - दोन तासात पोहोचलो. तिकडे आम्ही तिकीट काढून आतमध्ये गेलो. आतमध्ये जाऊन आम्ही खूप फोटो काढले. मग आम्ही एक्वेरियममध्ये गेलो, तिकडे खूप मासे होते. निळा, पिवळा, गुलाबी रंगांचे. तिथे बसायला माशांच्या आकाराचे बाक केले होते. तिकडे आम्ही बसून फोटो काढले. मग आतमध्ये गेलो. त्याठिकाणी फक्त एक्वेरियमच नव्हतं तर  पक्षांसाठी पण वेगळी जागा होती. वेगवेगळ्या तऱ्हेचे कबूतर, पोपट, कोंबडी आणि खूप पक्षी. खूप मोठे मोठे सरडे पण होते. ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गेले तर त्यांच्या अंगाचा रंग बदलतो. त्या सरड्यांना नावेही होती. iguana. बाकीच्यांची नावे माझ्या लक्षात नाहीत. 

थोडं आत गेल्यानंतर खूपशा फन अॅक्टिव्हिटी जसे की दोरीवरून उड्या मारणे, गाडी चालवणे, बोटिंग करणे. त्याच्यात एक मोठा सिलिंडरच्या आकाराचा ट्ब होता त्याच्यात मुलं आणि मोठी माणसं होती आणि तो ट्ब  स्विमिंग पूलमध्ये होता. आणि तो पाण्यावर तरंगत होता. त्याला हाताने पुढे ढकलता येत होतं. हे करण्यात मजा यायची. पण मी ते केलं नाही मी माझ्या दादाबरोबर रोप स्किपिंग केली. रोप स्किपिंग म्हणजे तिथं लोक हवेत लटकलेल्या दोरीवर सायकल चालवतात. खूप मजा आली. हे करताना आम्हाला वरून एक ortist दिसला. जो पिंजऱ्यात बंद होता. मी व माझा छोटा भाऊ बोटमध्ये बसलो. हे करून आम्ही बंपरकार चालवली म्हणजे एक छोटी टॉप कार सारखी एक असते जी आपल्याला चालवायची असते. खूप म्हणजे खूप मजा येते ही अॅक्टिव्हिटी करताना. हे करून आम्ही काहीतरी खायला गेलो. खाऊन आम्ही फोटो काढून घरी जायला निघालो. तिकडे आता स्नोवर्ड पण होणार आहे. तुम्ही तुमच्या परिवाराबरोबर जा. खूप चांगली जागा आहे. मजा येते तिकडे. मग नक्की जा हा!


कु. स्वरा रुपेश गावस 
इयत्ता : सहावी 
शाळा : डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, कुजीरा