हडफडेत इमारतीवरून पडून कामगार ठार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12 hours ago
हडफडेत इमारतीवरून पडून कामगार ठार

म्हापसा : हडफडे येथील न्यूटन सुपरमार्केटच्या सहामजली बांधकाम प्रकल्पाचे प्लास्टरींगचे काम करताना खाली पडून एक कामगार ठार झाला. स्वपन ज्योतीश रॉय (३४, रा. गिरी व मूळ पश्चिम बंगाल) असे या कामगाराचे नाव आहे.

ही घटना बुधवार, १४ रोजी सायंकाळी ५.३० वा. सुमारास घडली. न्यूटन सुपरमार्केटच्या इमारतीचे काम सुरू आहे. या प्रकल्पाच्या सहाव्या मजल्यावर चार कामगार बाहेरच्या बाजूने प्लास्टरींगचे काम करीत होते. या सर्वांनी सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्ट घातला होता. मात्र, अचानक स्वपनचा बेल्ट तुटला आणि तो थेट खाली कोसळला. जमिनीवर पडल्यामुळे स्वपन रॉय हा गंभीर जखमी झाला. त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळाल्यावर हणजूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह गोमेकॉत पाठवला. गुरूवारी सकाळी मृतदेह शवचिकित्सा केल्यानंतर कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सूरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्निल नाईक हे करीत आहेत. 

हेही वाचा