साळगाव : हॉटेलमध्ये घुसखोरी करून केली संमतीशिवाय व्हिडिओ रिकोर्डिंग

दोघांविरोधात साळगाव पोलिसांत गुन्हा नोंद.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
11th May, 12:39 pm
साळगाव :  हॉटेलमध्ये घुसखोरी करून केली संमतीशिवाय व्हिडिओ रिकोर्डिंग

पणजी : सांगोल्डा येथील कासा दे कॅटसन हॉटेलमध्ये गुन्हेगारी पद्धतीने घुसखोरी करणे, तसेच संमती शिवाय व्हिडिओ रेकॉर्ड करणे. या प्रकरणी साळगाव पोलिसांकडून आत्माराम गडेकर (काणका) आणि इम्रान (खोर्ली म्हापसा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

साळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी कासा डी कॅटसन हॉटेलचे कर्मचारी लज्जित यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, रविवार ४ मे रोजी रात्री १० वाजता संशयित आत्माराम गडेकर (काणका) आणि इम्रान (खोर्ली म्हापसा) यांनी व्यवस्थापनाच्या परवानगीशिवाय प्रवेश करून हाॅटेलच्या कर्मचारी, पाहुण्याची तसेच हॉटेल परिसरातील इतर भागांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले. 

याला कर्मचाऱ्यांनी विरोध करून परवानगीची माहिती मागवली असता, वरील संशयितांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच कर्मचाऱ्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले. याची दखल घेऊन साळगावचे पोलीस स्थानकाचे प्रभारी निरीक्षक राहुल परब यांनी वरील संशयिताविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२९(४), ३५२, ३५१(३) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. 

हेही वाचा