
पेडणे : कासारवर्णे पेडणे येथे शनिवारी रात्री ९.१५ वाजता झालेल्या चारचाकी व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला.

एम. एच. ०४ एफ. एफ. ३४४७ हे चारचाकी वाहन कासारवर्णे ते नागझर तर, विरुद्ध दिशेने जी.ए. ११ जे. २६२९ या दुचाकीवरुन सुहास मधुकर नारुलकर हा ४५ वर्षीय नागरिक आपल्या घरी जात होता.

महिंद्रा झायलो हे चारचाकी वाहन कासारवर्णे ते नागझरच्या दिशेने सुसाट वेगाने चालले होती. त्याचवेळी विरुद्ध दिशेने सुहास मधुकर नारुलकर जात असताना त्याला चारचाकी वाहनाने गंभीर जखमी केले. रुग्णालयात नेत असतानाच त्याचे वाटेतच निधन झाले.
अपघाताची माहिती मोपा पोलीस स्थानकाला कळताच त्यांनी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. महिंद्रा झायलोचा चालक विशाल गणेश नाईक (२३, मुंबई) या वाहनचालकाला मोपा पोलिसांनी अटक केली.
सुहास नारुलकर हा संत सोहिरोबानाथ आंबिये कॉलेजमध्ये चालक म्हणून काम करीत होता.