
पेडणे : न्यू वाडा मोरजी परिसरात दि. ९ रोजी पहाटे झालेल्या अपघातात वेस्पा स्कूटरवरील साहिल पार्सेकर (रा. पार्से) याचा मृत्यू झाला. तर, स्कुटरच्या मागे बसलेल्या रामानंद नेवजी याचा जीव वाचला आहे.
साहिल पार्सेकर आपल्या वेस्पा गाडीने मोरजीहून पार्सेकडे जात असताना एका बुलेट मोटारसायकलने त्यांच्या स्कूटरला जबरदस्त धडक दिली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की साहिल गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेज, बांबोळी येथे नेण्यात आले; मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
धडक दिल्यानंतर बुलेटस्वार थांबण्याऐवजी घटनास्थळावरून वाहनासह फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. मांद्रे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.