फातोर्डा डबल मर्डरप्रकरणी दोन संशयित दोषी

कामगार ठेकेदार, वृद्धेचा झाला होता खून

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
3 hours ago
फातोर्डा डबल मर्डरप्रकरणी दोन संशयित दोषी

मडगाव : फातोर्डा येथील मिंगेल मिरांडा (६२) व त्यांची सासू कॅटारिना पिंटो (८५) यांचा २०२१ मध्ये खून करण्यात आला होता. याप्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने संशयित रविनकुमार श्यामकुमार सडा (२२) व आकाश अजयकुमार घोष (२४) यांना खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवले आहे.

फातोर्डा येथे ७ मार्च २०२१ रोजी कामगार ठेकेदार असलेल्या मिंगेल मिरांडा व त्यांच्या सासू कॅटारिना पिंटो यांचे मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले होते. फातोर्डा पोलिसांनी याप्रकरणात तीन कामगारांना मुंबई येथून ताब्यात घेतले होते. यातील संशयित रविनकुमार श्यामकुमार सडा (२२, मूळ बिहार) व आकाश अजयकुमार घोष (२४, रा. मूळ झारखंड) हे एका अल्पवयीन साथीदारासह कामगार ठेकेदार असलेल्या मिरांडा यांच्याच भाड्याच्या खोलीत राहत होते. मिंगेल मिरांडा व कामगार यांच्यात देण्यात येणार्‍या मजुरीच्या पैशांवरुन वाद होत होते. याच रागातून कामगारांनी दोन खून केले होते. या सुनावणीवेळी न्यायालयात २४ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. अल्पवयीन संशयिताचा खटला बालन्यायालयात वर्ग करण्यात आला होता. रविनकुमार सडा व आकाश घोष या दोन्ही संशयितांना न्यायालयाने खुनाच्या कलमाखाली दोषी ठरवले. याप्रकरणी पुढील सुनावणी १७ डिसेंबर रोजी होणार असून त्यावेळी आरोपींच्या शिक्षेवर युक्तिवाद केला जाणार आहे. 

हेही वाचा