म्हापसा येथे अपघातात दुचाकीस्वार ठार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20 hours ago
म्हापसा येथे अपघातात दुचाकीस्वार ठार

म्हापसा : दत्तवाडी, म्हापसा येथे अपघातात भरत हलकी (२८, रा. बिलवान पेडे) हा दुचाकीस्वार युवक ठार झाला. स्वीफ्ट कारच्या उघडलेल्या दरवाजाला दुचाकीची धडक बसल्यामुळे हा अपघात घडला आहे.


गुरुवारी रात्री ८ वा. सुमारास हा अपघात घडला. युवक स्कुटरवरून दत्तवाडीतून मारुती मंदिरच्या दिशेने जात होता. गुरुवार निमित्त श्री दत्त मंदिरात भाविक देवदर्शनासाठी आले होते. रस्त्याच्या दुतर्फा त्यांनी गाड्या पार्क होत्या.

दुचाकीस्वार भरत हा उतरणीवरून खाली येत असताना मंदिरासमोर एकाने स्वीफ्ट कार पार्क केली. खाली उतरण्यासाठी उघडलेल्या दरवाजाला या दुचाकीची धडक बसली. त्याबरोबर तोल जाऊन दुचाकीची रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या एका दुचाकीला ठोकर बसली. त्यानंतर युवक रस्त्यावर कोसळला व गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उशीरापर्यंत रूग्णवाहिका पोहोचली नसल्याने पोलीस गाडीतून जखमीला जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

अपघाताचा पंचनामा पोलीस उपनिरीक्षक अजय धुरी व हवालदार नीलेश घाडी यांनी केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत. 

हेही वाचा