🚨 पणजी : दोन खांब जंक्शन-धारगळ, पेडणे येथील सदोष ट्राफिक सिग्नलमुळे आज दुपारी तीनच्या सुमारास टॅक्सी आणि ट्रकचा अपघात झाला. सर्वजण सुखरूप असून गाडीचा मात्र चक्काचूर झाला आहे.
⚠️ हाती आलेल्या माहितीनुसार, दोन खांब येथे उभारण्यात आलेल्या ट्राफिक सिग्नलची योग्य रित्या निगा राखली जात नाही. यामुळे ते कधीही सुरू आणि बंद होते. आज अशाच प्रसंगी दुपारी तीन वाजता, पर्यटक टॅक्सी या ठिकाणी पोहोचली असता, सिग्नलने थांबण्याचा इशारा दिला. त्यानुसार टॅक्सी चालकाने गाडी थांबवली. दरम्यान मागून येणाऱ्या ट्रकची टॅक्सीला धडक बसली. यात टॅक्सीचे नुकसान झाले. यात जखमी झालेल्यांना म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पेडणे पोलीस पुढील तपास करताहेत.
🚦 या सदोष सिग्नलचा त्रास यापूर्वी देखील अनेकांना नाहक सोसावा लागला आहे. सिग्नलमुळे येथून प्रवास करणे धोकादायक बनले असल्याचे प्रवाशांचे मत असून, येथे उड्डाणपूल व्हावा यासाठीही स्थानिक प्रयत्नरत आहेत.
🔄 बातमी अपडेट होत आहे.