अस्नोडा, थिवी पोटनिवणुकीत नाईक, नागवेकर विजयी

पोटनिवडणुकांसाठी काल झाले होते मतदान

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
5 hours ago
अस्नोडा, थिवी पोटनिवणुकीत नाईक, नागवेकर विजयी

म्हापसा : थिवी व अस्नोडा पंचायतीच्या प्रभाग १ व ७ साठी ११ मे रोजी पोटनिवडणूकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. अस्नोडा पंचायत प्रभाग ७ मधून मिता मिलेश नाईक तर थिवी पंचायत प्रभाग १ मधून नीरज नारायण नागवेकर हे  विजयी झाले आहे. 

थिवी पंचायत प्रभाग १ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र या पोटनिवडणुकीत विरोधी गटाने हा प्रभाग जिंकण्याची किमया केली आहे.

मिता मिलेश नाईक या १५७ मतांनी, तर नीरज नारायण नागवेकर हे ३३४ मतांनी विजयी झाले आहेत. सदर निवडणुकीची मतमोजणी बार्देश मामलेदार कार्यालयात झाली. निर्वाचन अधिकारी (संयुक्त मामलेदार) देवानंद प्रभू यांनी निकाल जाहीर केला. यावेळी सहाय्यक निर्वाचन अधिकारी (अव्वल कारकून) शैलेश कोठावळे तसेच संयुक्त मामलेदार मेघना नाईक या उपस्थित होत्या.

थिवी पंचायत प्रभाग १ मधून घनश्याम पुंडलिक आरोसकर यांना १५२ मते, रामचंदन रामचंद्र साळगावकर यांना ८९ तर व रवींद्र शिवा आरोसकर यांना २२४ मते मिळाली आहेत. तर अस्नोडा प्रभाग ७ च्या पोटनिवडणूकीसाठी शंकर पांडुरंग नाईक यांना ७९ व विजय बाबय बाणावलीकर यांना ५९ मते मिळाली आहेत.

थिवी पंचायतीचे प्रभाग १ चे तत्कालिन पंच सदस्य अर्जुन शिवा आरोसकर यांचे दि. १२ जानेवारी रोजी ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. तर अस्नोडा प्रभाग ७ चे तत्कालिन पंच सदस्य मिलेश मोहन नाईक यांचे दि. २ फेब्रुवारी मध्ये स्वंयअपघातात निधन झाले होते. त्यामुळे या दोन्ही रिक्त पंचसदस्य पदासाठी ही पोटनिवडणूक झाली होती.

हेही वाचा