डिचोलीत साकाणार ६० कोटींचा इंटिग्रेटेड प्रकल्प, 'अशा' असतील त्यात आधुनिक सुविधा

नूतन प्रशासकीय इमारत, कला भवन यांचा प्रकल्पात समावेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
डिचोलीत साकाणार ६० कोटींचा इंटिग्रेटेड प्रकल्प, 'अशा' असतील त्यात आधुनिक सुविधा

डिचोली : गोवा सरकारच्या साधन सुविधा महामंडळातर्फे सुमारे ६० कोटी रुपये खर्चून डिचोलीत साकारणाऱ्या  प्रशासकीय इमारत आणि ६०० प्रेक्षकांची क्षमता असलेला 'कलाभवन' प्रकल्प हा आधुनिक सुविधांनी युक्त असणार असून राज्यातील पहिला इंटिग्रेटेड प्रकल्प आहे, अशी माहिती आमदार डॉक्टर चंद्रकांत शेट्ये यांनी दिली. डिचोलीतील सोमवारी या ६० कोटीच्या प्रकल्पाची पायाभरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आली. 

या प्रकल्पाबाबत शेट्ये म्हणाले, हा प्रकल्प सुमारे ९८४ चौरस मीटर क्षेत्रात सामावणार असून त्यामध्ये सुमारे १२० वाहनांसाठी पार्किंगची सोय असेल. पहिल्या मजल्यावर रिसेप्शन, ऑडिटोरियम, ग्रीन रूम, फूड काऊंटर सरकारी कार्यालय, वाचनालय, टॉयलेट, ब्लॉक ओपन पोडीएम आदी सुविधा असतील. 

तर दुसऱ्या मजल्यावर तलाठी कार्यालय, मूटेंशन सेल,कंट्रोल रूम,मामलेदार  वकार्यालय कोर्टरूम, बॅलेट बॉक्स स्ट्रॉंग रूम,बाल भवन असेल. तसेच अप्पर लेव्हल एन्ट्री ऑडिटोरियममध्ये असेल.

तिसऱ्या मजल्यावर मतदारांसाठी सुविधा सेंटर तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्था, प्रशिक्षण सेंटर, सहाय्यक लेबर, कमिशनर कार्यालय, उपजिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय, हॉल, ऑडिटोरियम टॉयलेट ब्लॉक असतील, चौथ्या मध्यावर एअर कंडिशन सभागृह असेल, अशी माहिती आमदार डॉक्टर चंद्रकांत शेटये यांनी दिली. 

जुनी मामलेदार कार्यालय इमारत आहे तशीच ठेवून बाजूच्या संपूर्ण मोकळ्या जागेत कला भवन प्रशासकीय संकुल उभारण्यात येणार आहे. जुन्या इमारतीला नवा साज देताना संपूर्ण संकुलाला आधुनिक सुविधांनी युक्त संकुल बनवण्यात येणार आहे. डिचोलीवासियांचे अनेक वर्षाचे स्वप्न आगामी दोन वर्षात साकारणार असल्याने आनंद होत असल्याचे आमदार डॉक्टर चंद्रकांत शेटये यांनी या प्रकल्पाची माहिती देताना सांगितले.

हेही वाचा