ऑपरेशन सिंदूर : आज रात्री ८ वाजता पंतप्रधान मोदी करणार देशाला संबोधित

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
ऑपरेशन सिंदूर : आज रात्री ८ वाजता पंतप्रधान मोदी करणार देशाला संबोधित

🇮🇳 नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता राष्ट्राला संबोधित करतील. गेल्या एका आठवड्यात झालेल्या घडामोडींसंदर्भात पंतप्रधान मोदी देशाला माहिती देतील अंदाज वर्तवला जात आहे. भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधानांचे हे पहिलेच सार्वजनिक संबोधन असेल.

💥 पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची परिस्थिती आणखी बिकट, आता शस्त्रसंधी

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सैन्याने ७ मे रोजी पाकिस्तानच्या ९ ठिकाणांवर ऑपरेशन सिंदूर राबवले.

✈️ आतोनात नुकसान झाल्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने जम्मू, पठाणकोट, फिरोजपूर, कपूरथळा, जालंधर आणि जैसलमेर येथील भारतीय लष्करी तळांवर लढाऊ विमाने, ड्रोन, रॉकेट आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय, अनेक भारतीय शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. तथापि, भारतीय सैन्याने हे हल्ले पूर्णपणे हाणून पाडले.

🕊️ शस्त्रसंधीचे आवाहन

सलग चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर, पाकिस्तान मागे पडला आणि त्याने भारताला शस्त्रसंधीचे आवाहन केले. भारताने स्वतःच्या अटींवर ही शस्त्रसंधी स्वीकारली.

📢 आता, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या संभाव्य भाषणात देशाला सध्याची परिस्थिती आणि भविष्यातील रणनीती याबद्दल माहिती देतील अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा