शनिवारी मध्यरात्री २ च्या सुमारास बसले भूकंपाचे धक्के
इस्लामाबाद : भारताने केलेल्या हल्ल्यांमुळे धुमसत असलेल्या पाकिस्तानातून एक महत्त्वाची माहिती समोर येतेय. पाकिस्तानमध्ये ४.० रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानवर दुहेरी संकट ओढवले असून सध्या पाकिस्तानमध्ये भीतीची वातारवण पसरले आहे.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने भूकंपाची पुष्टी केली असून याची तीव्रता ४.० रिश्टर स्केल राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राकडून सांगण्यात आलं आहे. तर या भुकंपामुळे पाकिस्तानचं नेमकं काय नुकसान झालं? याबाबतची माहिती अद्याप पुढे आलेली नाही.
पाकिस्तानचा पहलगाम हल्ला, त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेले ऑपरेशन सिंदूर, आणि त्यानंतर पाकिस्तानच्या भारतीय सीमाभागातील कुरापती या घडामोडींमध्ये दोन्ही देशात तणावाचे वातावरण बनले आहे.
पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतही चोख प्रत्युत्तर देत असून भारताकडून इस्लामाबाद आणि रावळपिंडी सारख्या शहरांना लक्ष्य करण्यात आले आहे. या हल्ल्यांमधून जीवित आणि वित्त हानी होत असतानाच आता पाकिस्तानवर हे अस्मानी संकट ओढवले आहे.