🚨श्रीनगर : भारताच्या प्रत्युत्तराने बिथरलेल्या पाकिस्तानने गुरुवारी भारताविरुद्ध मोठी आगळीक करण्याचा प्रयत्न केला.
🎯जम्मू आणि काश्मीरसह राजस्थान, पंजाबसारख्या सीमावर्ती राज्यांमधील अनेक शहरांना लक्ष्य करून पाकिस्तानने एकाच वेळी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले.
✈️मात्र, भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानचा हा डाव पूर्णपणे उधळून लावला, तसेच भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणारी पाकिस्तानची काही लढाऊ विमानेही पाडली.
📍पाकिस्तानने विशेषतः जम्मू विभागावर लक्ष केंद्रित केले. 🌙गुरुवारी रात्री उशिरा आणि पहाटेच्या सुमारास पाकिस्तानी ड्रोननी जम्मू विमानतळ, रेल्वे स्टेशन, चन्नी हिम्मत आणि आर.एस. पुरासारख्या संवेदनशील ठिकाणांवर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. ✈️जम्मू विद्यापीठाजवळ भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने दोन पाकिस्तानी ड्रोन पाडले. 🛡️जम्मूतील इतरही अनेक ड्रोन एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीने प्रभावीपणे नष्ट केले. 🔦या हल्ल्याच्या प्रयत्नांदरम्यान, खबरदारी म्हणून संपूर्ण जम्मू आणि काश्मीरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला होता.
🗺️जम्मू आणि काश्मीरशिवाय पाकिस्तानने राजस्थान (जैसलमेर, बारमेर, जोधपूर) आणि पंजाबमधील (जालंधर, पठाणकोट, अमृतसर) सीमावर्ती भागातही ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. 🚀भारताने पाकिस्तानने डागलेली सर्व क्षेपणास्त्रे यशस्वीरित्या पाडली आहेत.
✈️🔥भारताने पाडली पाकिस्तानची लढाऊ विमाने
पाकिस्तानने केवळ ड्रोन आणि क्षेपणास्त्रेच नाहीत, तर लढाऊ विमानांच्या माध्यमातूनही भारतीय हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. 🛡️मात्र, भारतीय हवाई दलाच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्नही अयशस्वी ठरला. 💥भारताने विमानविरोधी तोफांचा वापर करून सर्व ड्रोन पाडले, तर भारतीय हवाई दलाने कारवाई करत पाकिस्तानची अनेक लढाऊ विमाने पाडली असल्याचा दावा करण्यात आला आहे. ⚠️यात पाकिस्तानची २ जेएफ-१७ आणि एक एफ-१६ विमान पाडल्याची माहिती आहे. ही विमाने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होती.
⚠️✈️श्रीनगर विमानतळावर हाय अलर्ट
पाकिस्तानच्या आक्रमकतेनंतर श्रीनगर विमानतळावर तातडीने हाय अलर्ट जारी करण्यात आला. 🛡️पाकिस्तानने केलेला हा 'हमास शैलीचा' क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला भारतीय काउंटर ड्रोन सिस्टीम आणि एस-४०० सारख्या हवाई संरक्षण प्रणालीने पूर्णपणे उधळला. 🇮🇳भारताने पाकिस्तानच्या आक्रमकतेला चोख प्रत्युत्तर देत आपली हवाई संरक्षण सज्जता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.