नवी दिल्ली : लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ संसद भवनात सर्वपक्षीय बैठक बोलावली असून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू असून गृहमंत्री अमित शहा, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे सरकारचे प्रतिनिधित्व करत आहेत. बैठकीस काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विविध पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत.
बैठकीत केंद्र सरकारकडून ऑपरेशन सिंदूरची माहिती, त्यामागील गुप्तचर यंत्रणांचे आढावे, भविष्यातील सुरक्षाव्यवस्था, सीमावर्ती भागातील तयारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उचलल्या जाणाऱ्या पावलांची माहिती विरोधकांना देण्यात येत आहे. देशाच्या सुरक्षा हितासाठी सर्वपक्षीय सहकार्याची अपेक्षा सरकारने या बैठकीत व्यक्त केली आहे.
भारताच्या या कारवाईनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरही दहशतवादाविरोधात भारताची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. लष्करी कारवाईबरोबरच राजनैतिक आणि धोरणात्मक पातळीवरही भारत सज्ज असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
बातमी अपडेट होत आहे.