कराचीत मोठा दणका
इस्लामाबाद : भारतीय सैन्याने गुरुवारी रात्रभरात केलेल्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानमध्ये एकच हाहाकार माजलाय. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत धडक मारत भारतीय लष्कराने ड्रोन आणि हवाई हल्ले केले. त्यामुळे इस्लामाबादेत भीतीचं वातावरण पसरले आहे. केवळ इस्लामाबादच नाही तर लाहोर आणि पेशावरचीही भारतीय सैन्यांनी झोप उडवली आहे.
पाकिस्तानने जम्मू काश्मीरमध्ये एलओसीवर रात्रभर जोरदार गोळीबार केला. त्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले. भारताने केलेल्या भडीमारात पाकिस्तानी चौक्या अक्षरशः भाजून निघाल्या. दक्षिण काश्मीरमधील पूंछ, राजौरी, सांबा सेक्टरमध्ये एलओसीवर पाकिस्तानचा रात्रभर तोफांचा भडीमार सुरू होता.
आत्तापर्यंतची भारतीय सैन्याची कारवाईः-
८ आणि ९ मेच्या दरम्यान पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांवर मिसाईल व ड्रोनद्वारे हल्ले करण्याचा प्रयत्न केला. जम्मू, पठाणकोट, अमृतसर, उदमपूर यासह जैसलमेरपर्यंतच्या तळांवर हल्ल्याचा उद्देश होता. मात्र, भारतीय वायुदलाच्या एस-४०० प्रणालीने सर्व लक्ष्ये हवेतच नष्ट केली.
• पाकिस्तानला कराचीत मोठा दणका.
पाकिस्तानातल्या महत्त्वाच्या कराची बंदरावरच भारतीय नौदलानं हल्ल्यामागून हल्ले केले. १४ पेक्षा जास्त स्फोटांनी कराची बंदर हादरून गेले आहेत. भारतीय नौदलाच्या धडक कारवाईनंतर घाबरगुंडी उडालेल्या पाकिस्तानने कराची बंदरात ब्लॅकआऊट केले. १९७१ नंतर पहिल्यांदाच भारतीय नौसेनेनं पाकिस्तानच्या कराची बंदराला टार्गेट केलं.
• कराची पोर्टवर जोरदार हल्ला
पाकिस्तानच्या सातत्याने चालू असलेल्या उकसवणाऱ्या कारवायांवर भारतीय नौदलाने उत्तर देत कराची पोर्टवर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात मोठा नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कराची बंदरावर स्फोटांचा आवाज ऐकायला मिळाला. हा भारताचा निर्णायक टप्पा होता.
• लाहोर, इस्लामाबाद, पीओकेपर्यंत भारताचा प्रहार
भारताच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईत लाहोरमध्ये चीनच्या मदतीने उभारलेल्या एचक्यू-९ मिसाईल प्रणाली उद्ध्वस्त करण्यात आली. याशिवाय, रावळपिंडी, बहावलपूर, सियालकोट, खेजू (सिंध), कोटली (पीओके) आदी ठिकाणांवर सर्जिकल स्ट्राईकसदृश कारवाई झाली.
• पाकिस्तानचे ड्रोन हवेतच उद्ध्वस्त
पाकिस्तानकडून पाठवलेले सर्व ड्रोन आणि मिसाईल्स भारतीय डिफेन्स सिस्टमने हवेतच उद्ध्वस्त केले. अत्याधुनिक 'सुदर्शन चक्र' एस-४०० प्रणालीने ४०० किमीपर्यंतच्या हवाई लक्ष्यांना टिपून वेळेत नष्ट केले. ही प्रणाली भारताच्या हवाई सुरक्षेतील एक प्रमुख आधारस्तंभ बनली आहे.
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अमेरिकेशी चर्चा
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे विदेश सचिव मार्को रुबियो यांच्याशी संवाद साधला. भारताने पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील वागणुकीकडे लक्ष वेधले. जयशंकर म्हणाले की, भारत शांततेसाठी प्रयत्नशील आहे, मात्र उकसवणीला प्रत्युत्तर देण्याची आमची तयारी कायम आहे.
• विमान कंपन्यांची प्रवाशांना विशेष सूचना
सीमेवरील तणावामुळे इंडिगो, अकासा व अन्य कंपन्यांनी प्रवाशांसाठी अॅडव्हायजरी जारी केली. हवाई मार्गात बदल होण्याची शक्यता लक्षात घेता प्रवाशांनी तीन तास आधी पोहोचण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सुरक्षा तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे.
• भारतावरच्या हल्ल्याचे तीव्रतेचे प्रत्युत्तर दिले जाईल
भारताने स्पष्ट केले की, संयम ठेवणे म्हणजे दुर्बलता नाही. लष्करी प्रवक्ते विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी स्पष्ट केले होते की 'ऑपरेशन सिंदूर' हे दहशतवाद्यांवर केंद्रित होते. मात्र भारतावर कोणताही हल्ला झाला, तर तीव्रतेचे प्रत्युत्तर दिले जाईल, त्यानुसार भारत कारवाई करत आहे.