दुसरा युवक गंभीर : बांबोळीतील गोमेकॉत उपचार

पेडणे : मोरजी समुद्रकिनारी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला समुद्रस्नान करणारे बिहारमधील दोघे पर्यटक युवक बुडाले (two youth tourist form Bihar drowned in Morjim Goa). त्यातील एकाचा मृत्यू झाला, तर दुसर्याची प्रकृत्ती चिंताजनक असून त्याच्यावर बांबोळी (GMC Bambolim) येथील गोमेकॉमध्ये उपचार सुरू आहेत.
मृताचे नाव आदित्य नारायण (२६) (Aditya Narayan) असे आहे, तर आदित्य राज (२५) (Aditya Raj) हा जखमी आहे. ही दुर्घटना बुधवारी ३१ रोजी सांयकाळी ६.१० वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक समुद्रस्नान करत होते. सांयकाळी ६ वाजल्यानंतर जीवरक्षकांनी सर्वांना पाण्यातून बाहेर येण्याची सूचना केली. मात्र बर्याच जणांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यामध्ये आदित्य नारायण व आदित्य राज या युवकांचा समावेश होता. जीवरक्षक सूचना करत अयतानाच अचानक हे दोघेही पर्यटक युवक पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. लगेच इतर पर्यटकांच्या सहाय्याने जीवरक्षकांनी त्यांना पाण्याबाहेर काढले.
समुद्राचे पाणी पोटात गेल्यामुळे दोघेही युवक बेशुद्धावस्थेत पडले. समुद्रकिनारी काही डॉक्टर पर्यटकांचा गट होता. त्यातील दोघा महिला व एका पुरुष डॉक्टराने जखमींना प्राथमिक उपचार दिले. मात्र एका पर्यटकाकडून या उपचाराला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, तर दुसर्याचा जीव वाचला.
त्यानंतर जखमीला पर्यटक पोलिसांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून तुये हास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी आदित्य नारायण याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले,, तर आदित्य राज याला प्रथम म्हापसा जिल्हा इस्पितळात व नंतर तिथून पुढील उपचारार्थ गोमेकॉत हलविण्यात आले. त्याची प्रकृत्ती चिंताजनक आहे.
समुद्रकिनारी असलेल्या एका बॅगेमध्ये सापडलेल्या ओळखपत्रावरून पोलिसांनी मृत व जखमीची ओळख पटवली आहे. पुढील तपास मांद्रे पोलीस निरीक्षक गिरेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जयदीप पालयेकर हे करत आहेत.