मगरीपासून साथीदाराला वाचवण्यासाठी माकडांनी केली नदी पार; ओडिशातील घटना

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
11 mins ago
मगरीपासून साथीदाराला वाचवण्यासाठी माकडांनी केली नदी पार; ओडिशातील घटना

नवी दिल्ली : ओडिशातील ( Odisha)  एका नदीत मगरीने पकडलेल्या साथीदाराला वाचवण्यासाठी माकडांच्या एका गटाने नदीत उडी घेतली. त्यानंतर मगरीच्या मागे जाऊन नदी पार केली. यासंदर्भातील एक नाट्यमय व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यात मगरीपासून माकडाला सोडवण्यासाठी माकडांचा एक गट नदीत पोहत मगरीचा पाठलाग करीत आहे. 



ओडिशाच्या केंद्रपाडा जिल्ह्यातील (Kendrapara district ) महाकालपाडा परिसरात घडलेल्या घटनेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.  मगरीने (Crocodile) एका माकडावर (monkeys)  हल्ला करून त्याला नदीत ओढल्यानंतर अनेक माकडे थेट मगरीच्या दिशेने पोहू लागली. मगरीचा पाठलाग केला.  परंतु ते माकडाला वाचवू शकले नाहीत.


ओडिशा के जंगल में पानी में 'दंगल'! मगरमच्छ के जबड़ों से साथी को बचाने नदी  में उतरी 'वानर सेना' - viral video monkeys attempt to save friend from  crocodile


ही घटना नदीच्या एका उपनदीत घडली. याठिकाणी मगरींचा वावर कायम असतो. जलमार्गांमुळे प्राणी व मानवालाही धोका संभवतो. माकड मगरीच्या मागे लागत असलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यावर अनेक प्रतिक्रियांचा माराही सुरू आहे. ‘‘प्राण्यांच्या एकजुटीचा एक विलक्षण क्षण असल्याचे’’ एकाने म्हटले आहे.  ‘‘या आठवड्यात पाहिलेली सर्वात जबरदस्त सांघिक कामगिरी, निसर्गाशी खेळू नका,’’ असे आणखी एकाने लिहिले आहे. ‘‘अत्यंत धाडसी माकडे. त्यांचे कौतुक,’’  तिसऱ्या व्यक्तीने प्रतिक्रिया दिली आहे. अशा अनेक प्रतिक्रियांचा पाऊस व्हिडीओवर पडला आहे. 


हेही वाचा