गुगलवर ‘६७’ सर्च करताच स्क्रीनवर दिसेल जादू!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
58 mins ago
गुगलवर ‘६७’ सर्च करताच स्क्रीनवर दिसेल जादू!

सध्याच्या डिजिटल युगात इंटरनेट आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. कोणतीही माहिती हवी असल्यास आपण लगेच गुगल सर्चचा आधार घेतो. मात्र, सध्या तरुणाईमध्ये एका विशेष नंबरची मोठी चर्चा सुरू आहे. गुगल सर्च बारमध्ये फक्त ‘६७’ (67) हा आकडा टाईप केल्यावर जे घडते, ते पाहून अनेक युजर्स थक्क झाले आहेत. हा आकडा इतका लोकप्रिय झाला आहे की, जेन-जी (Gen-Z) पॉप कल्चरमध्ये याची मोठी क्रेझ पाहायला मिळत असून ‘ऑक्सफर्ड डिक्शनरी’मध्येही या शब्दाला स्थान मिळाले आहे.


67 Has Eclipsed 69 in Global Google Search Popularity [OC] :  r/dataisbeautiful


नेमकी ही ट्रिक काय आहे?


 जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरील गुगल सर्च बारमध्ये ‘६७’ किंवा ‘६-७’ टाईप करून सर्च करता, तेव्हा अचानक तुमची स्क्रीन काही सेकंदांसाठी थरथरू लागते. सुरुवातीला युजर्सना हा आपल्या फोनमधील तांत्रिक बिघाड किंवा ‘बग’ वाटतो, परंतु प्रत्यक्षात हे गुगलने केवळ मनोरंजनासाठी डिझाइन केलेले एक गमतीशीर फिचर आहे. ‘ब्रेनरॉट’ (Brainrot) या सध्याच्या प्रसिद्ध स्लॅंग शब्दाचा हा एक भाग असून, गुगलने सोशल मीडियावरील आपली व्याप्ती वाढवण्यासाठी ही युक्ती वापरली आहे. हे फिचर पूर्णपणे सुरक्षित असून, पेज रिफ्रेश केल्यावर स्क्रीन पुन्हा पूर्ववत होते. ६७ या आकड्याची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, काही जागतिक दर्जाच्या शब्दकोशांनी याला ‘वर्षातील सर्वोत्कृष्ट शब्द’ म्हणूनही घोषित केले आहे.


67 Google Easter Egg: Why is it trending, what 6-7 trend means and how to  make your search screen dance - The Economic Times


सोशल मीडियावर गाजणारे ‘६७’ मीम नेमके काय?

 या ‘६७’ मीमची मुळे रॅप संगीत, बास्केटबॉल आणि टिकटॉकच्या व्हायरल जगात खोलवर रुजलेली आहेत. या ट्रेंडची पहिली ठिणगी फिलाडेल्फिया येथील प्रसिद्ध रॅपर ‘स्क्रिला’ (Skrilla) याच्या ‘डूट डूट (6 7)’ या गाण्यामुळे पडली. या गाण्यात त्याने ‘६-७’ हा उल्लेख त्याच्या परिसरातील ‘६७ व्या गल्लीचा’ (67th Street) संदर्भ देण्यासाठी केला होता. अमेरिकन टिकटॉकर्सनी या रॅपमधील नेमका तोच भाग उचलला आणि पाहता पाहता हा एक व्हायरल स्लॅंग शब्द बनला.




बास्केटबॉल कोर्ट आणि मॅव्हरिकची ती आरोळी...

 या ट्रेंडला खरी जागतिक ओळख बास्केटबॉलच्या मैदानातून मिळाली. एनबीए (NBA) स्टार लॅमेलो बॉल याच्या ‘हाइप’ व्हिडिओमध्ये या आकड्याचा वारंवार वापर करण्यात आला. हा आकडा क्रीडाप्रेमींमध्ये लोकप्रिय झाला. त्यातच भर पडली ती ‘मॅव्हरिक’ नावाच्या एका मुलाच्या टिकटॉक व्हिडिओची. एका बास्केटबॉल सामन्यादरम्यान कॅमेरा आपल्याकडे असल्याचे पाहून मॅव्हरिकने पूर्ण ताकदीनिशी ठोकलेली “सिक्स सेवेन्नन” (SIX SEVEENNN) अशी आरोळी इतकी व्हायरल झाली की, तोच या मीमचा मुख्य चेहरा बनला.




 गुगलने याआधीही ‘Do a barrel roll’ आणि ‘Askew’ सारख्या अनेक गमतीशीर ट्रिक्स (Google Easter Eggs) आपल्या व्यासपीठावर आणल्या आहेत. मात्र, सध्या या नव्या ‘६७’ ट्रेंडने तंत्रज्ञान आणि मनोरंजनाची एक आगळीवेगळी सांगड घालून इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

हेही वाचा