
पंजाब (Punjab) : लुधियाना (Ludhiana) येथील उद्योगपती (Industrialist) एसपी ओसवाल यांना डिजिटल अटक दाखवून ७ कोटी (7 Crore) रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी अंमलबजावणी संचालयाने (ईडी) पंजाब, हरियाणा (Haryana), राजस्थान (Rajsthan), गुजरात (Gujrat) व आसाम (Assam) या पाच राज्यांमधील ११ ठिकाणी छापे टाकून शोधमोहीम राबवली.
शोधमोहिमेदरम्यान विविध गुन्हेगारी कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली, असे ईडीच्या प्रवक्त्याने सांगितले. छापेमारीदरम्यान, ईडीने अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. लुधियाना सायबर गुन्हे पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरवरून ईडीने तपास सुरू केला आहे.
ईडीला विविध राज्यांमध्ये एकाच टोळीशी संबंधित सायबर गुन्हे व डिजिटल अटकेचे नऊ अतिरिक्त गुन्हे आढळून आले. त्यांचा तपासात समावेश करण्यात आला आहे. याप्रकरणी ईडी अधिक तपास करीत आहे. याप्रकरणी आसाममधून अटक केलेल्या रुमी कलिताला २ जानेवारी, २०२६ पर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी तपास यंत्रणा अधिक तपास करीत आहेत.