देशात दरवर्षी ५ लाख अपघात; १.८ लाख लोकांचा मृत्यू : ६६ टक्के मृत्यू तरुणांचे

केंद्र सरकार आखतेय राज्यांना आधुनिक रुग्णवाहिका देण्याची योजना

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
देशात दरवर्षी ५ लाख अपघात; १.८ लाख लोकांचा मृत्यू : ६६ टक्के मृत्यू तरुणांचे

नवी दिल्ली (New Delhi) : दरवर्षी देशभरात ५ लाख रस्ते अपघात होतात व त्यात १.८ लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यातील ६६ टक्के मृत्यू हे तरुणांचे असून, १४ ते ३४ या वयोगटातील आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari, Minister of Road Transport and Highways of India) यांनी राज्यसभा (Rajyasabha) सभागृहात यासंदर्भात माहिती दिली. 

कॉंग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी याविषयी विचारलेल्या प्रश्नावर मंत्री नितीन गडकरी यांनी सविस्तर माहिती दिली. कठोर कायदे करून व रस्त्यांच्या पायाभूत सुविधांत सुधारणा करूनही मृत्यूंची संख्या कमी झाली नसल्याचे नमूद करीत हे सरकारचे अपयश असल्याचा आरोप खासदार प्रमोद तिवारी यांनी यावेळी केला. केंद्र सरकार राज्यांना आधुनिक रुग्णवाह‌िका देण्याची योजना आखत असल्याचे यावेळी मंत्री गडकरी यांनी सांगितले. या योजनेनुसार अपघात झालेल्या ठिकाणी रुग्णवाहिका अवघ्या १० मिनिटांच्या आत पोचतील.

जखमींना वेळेवर उपचार मिळाल्यास अपघातातील ५० हजार जणांचा जीव वाचवू शकतो, असे गडकरी म्हणाले. आयआयएमच्या एका अभ्यासाचा हवाला देत त्यांनी ही बाब स्पष्ट केली.  गेल्या पाच वर्षांत मंजूर झालेले ५७४ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प निश्चित वेळ होऊनही मागे पडले आहेत. ३.६० लाख कोटी रुपये एवढी त्यांची एकूण किंमत आहे. यातील ३०० प्रकल्प एका वर्षापेक्षा कमी, २५३ प्रकल्प १ ते ३ वर्षे व २१ प्रकल्प ३ वर्षांपेक्षा जास्त काळापासून प्रलंबित असल्याची माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी

हेही वाचा