
अहमदाबाद : गोव्यातून अहमदाबादला (Goa to Ahmedabad) जाणाऱ्या क्रमांक ६इ६२०८ या इंडिगो विमानाला (Indigo Flight) काल संध्याकाळी बॉंबने उडवण्याची धमकी मिळाली. विमान अहमदाबादला पोचल्यावर एक टिश्यू पेपर मिळाला. त्यातून हे विमान बॉंबने उडवण्याचा धमकी देणारा संदेश मिळाला. यासंदर्भात एअरलाईन्सने विमानतळ प्राधिकरणाला (Airport Authority) माहिती दिल्यानंतर सीआयएसएफ (CISF) आणि बॉंब शोध पथकाने विमानात तपासणी केली.
गोव्यातून अहमदाबादला जाणारे हे विमान संध्याकाळी ७ वाजता अहमदाबाद विमानतळावर पोचले. त्यातून १४० पेक्षा जास्त प्रवासी होते. त्यातून सर्व प्रवाशांना बाहेर काढले. घटनेची माहिती मिळाल्यावर स्थानिक पोलीस विमानतळावर पोचले. विमानात कसलेच संशयास्पद साहित्य सापडले नाही. अहमदाबाद विमानतळाच्या प्रवक्त्याने सांगितले की, मोपा विमानतळावरून अहमदाबाद येथे आलेल्या विमानात सुरक्षेविषयी धोक्याची नोंद मिळाली होती. विमानतळावरील कामकाजावर त्याचे कसलेच परिणाम झाले नाहीत.