धकाधकीच्या जीवनशैलीमुळे तरुणाईत बळावतोय हृदयविकार

४२.६ टक्के मृत्यू केवळ ह्रदयविकाराने; एम्सच्या अभ्यासात झाले उघड

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
34 mins ago
धकाधकीच्या जीवनशैलीमुळे तरुणाईत बळावतोय हृदयविकार

नवी दिल्ली : तरुणाईमधील (Youths) वाढते मृत्यूचे प्रमाण हे चिंताजनक असून, त्यामागे प्रामुख्याने ह्रदयविकार (Heart Attack) व बिघडलेली जीवनशैली (Lifestyle) हेच कारण असल्याचेअभ्यासात (study) पुढे आले आहे. नवीदिल्लीतील (Delhi) एम्सने (AIIMS) यासंदर्भात केलेल्या अभ्यासात १८ ते ४५ वयोगटात अचानक होणाऱ्या मृत्यूंच्या मागे ह्रदयविकार हेच मुख्य कारण असल्याचे नमूद केले आहे.

मे, २०२३ ते एप्रिल, २०२४ या दरम्यान इंडियन काऊन्स‌िल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) खाली करण्यात आलेल्या अभ्यासात शवविच्छेदनांच्या नोंदींची पडताळणी करण्यात आली. त्यात अचानक मृत्यू झालेल्या प्रकरणांपैकी ८ टक्के प्रकरणे या निकषांखाली येतात. त्यात ५७ टक्के मृत्यू युवकांचे होते व सरासरी वय ३३.६ वर्षे एवढे होते. तुलनेत महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण खूप आहे.

अभ्यासातील अचानक मृत्यूंची प्रमुख कारणे

४२.६ टक्के मृत्यू ह्रदयविकाराने 

अभ्यासाअंती, अचानक मृत्यूंची प्रमुख कारणे दिसून आली आहेत ती म्हणजे; ह्रदयविकार (४२.६ टक्के), श्र्वसनविकार (२१.३ टक्के) तर (२१.३ टक्के) मृत्यूंची कारणे स्पष्ट झालेली नाहीत. नमूद करण्यासारखे म्हणजे कोविड १९ चा थेट संबंध दिसून आला नसल्याचे अभ्यासात स्पष्ट झाले आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, तरुणांईमध्ये मद्यसेवन, धूम्रपान, अपुरी झोप, बैठी जीवनशैली, ताणतणाव यांसारख्या जीवनशैलीनिगडीत सवयी मोठा धोका ठरत आहेत. अभ्यासात हेही दिसून आले की, मृत्यू पावलेल्यांपैकी ५७ टक्के धूम्रपान करणारे तर ५२ टक्के मद्यसेवन करणारे होते; असे निदर्शनास आले.  

हेही वाचा