
नवी दिल्ली : कर्मचारी आता लवकरच एटीएम (ATM) व यूपीआयमधून (UPI) पीएफचे (PF) पैसे थेट काढू शकणार. पीएफ यूपीआयशी लिंक करण्याच्या प्रक्रियेचे काम मार्च पूर्वी पूर्ण होणार आहे. कर्मचारी त्यानंतर एटीएममधून पीएफचे पैसे काढू शकतील, अशी माहिती केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया (Union Labour Minister Mansukh Mandaviya) यांनी दिली.
सध्या आपला हक्काचा पीएफ काढायचा म्हटले तर प्रक्रिया खूपच किचकट आहे. फार्म भरून भरून कर्मचारी थकतात. ही प्रक्रिया जलद व सोपी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हळूहळू किचकट नियम बदलले जात आहेत. ७५ टक्के पीएफची रक्कम कोणतेही कारण नसताना काढता येते. २५ टक्के रक्कम काढता येत नाही. कर्मचारी मार्च महिन्यापू्र्वी पीएफची रक्कम एटीएम किंवा यूपीआय मधून काढू शकतील. यापू्र्वी पीएफची खाती बॅंक खाती, आधार किंवा यूएएनशी जोडण्यात आली आहेत. आता पीएफ फंक्शनॅलिटी डेबिड कार्ड किंवा एटीएमशी जोडली जाणार असल्याचे मंत्री मांडविया यांनी स्पष्ट केले.