राजीव कला मंदिरच्या सहाव्या ऐतिहासिक नाट्यस्पर्धेत यश

फोंडा : राजीव गांधी मंदिरने आयोजित केलेल्या सहाव्या अखिल गोमंतकीय स्व. रवींद्र लक्ष्मण नाईक स्मृतिप्रत्यर्थ ऐतिहासिक नाट्यस्पर्धेत श्री देवी भगवती क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ, पेडणे यांनी सादर केलेल्या ‘रणांगण’ नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला.
द्वितीय क्रमांक ओम कला सृष्टी, बांदोडा यांच्या ‘रायगडला जेव्हा जाग येते’, तृतीय पारितोषिक गजांत लक्ष्मी स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब, वळवई यांनी सादर केलेल्या ‘आकाशमिठी’ नाटकाला मिळाले. उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक ‘अपराजित योद्धा’ (ओम कला संस्कृती केंद्र, पेडणे), द्वितीय ‘सीमेवरून परत जा’ (होमकुंड रंगभूमी, मडकई) तृतीय ‘दुसरा पेशवा’ (रवळनाथ युनिटी स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब, पेडणे) यांना मिळाले.
पुरुष अभिनय प्रथम मंथन नाईक (शिवाजी : रायगडला जेव्हा जाग येते), विशाल गावस (बाजीराव पेशवा : दुसरा पेशवा), रतेश गावडे (चौरस : सीमेवरून परत जा). उत्कृष्ट नेपथ्य दिलेश हजारे (रणांगण), द्वितीय प्रवेश तारी (आकाशमिठी). उत्कृष्ट प्रकाश योजना : प्रथम उमेश कार्बोटकर (अपराजित योद्धा), द्वितीय रोहक मंगेशकर (रणांगण).
उत्कृष्ट ध्वनी संकलन तानाजी गावडे (रायगडला जेव्हा जाग येते), द्वितीय सागर गावस (सीमेवरून परत जा).
उत्कृष्ट वेशभूषा प्रथम : दिवेत प्रियोळकर, दुर्गादास नाईक (सीमेवरून परत जा), द्वितीय समीक्षा सावंत, प्रशांत परब (अपराजित योद्धा), उत्कृष्ट रंगभूषा प्रथम जितेंद्र परब (रणांगण), द्वितीय प्रमोद गोवेकर (आकाशमिठी). उत्कृष्ट बालकलाकार प्रथम वेदांत नाईक (रायगडला जेव्हा जाग येते), उत्कृष्ट नवीन संहिता : नरेंद्र मधुकर नाईक (अपराजित योद्धा).
पुरुष भूमिकेसाठी प्रशस्तीपत्र अमोल नाईक, यश परब, रतिश तारी, राज परब, सचिन हळर्णकर, हरिश्चंद्र सरनाईक, महादेव परवार, संदीप फडते, कुलदीप परब, संदीप वेरेकर, मोहनीश वेर्णेकर, अरुण नाईक, गोविंद तारी, विभवकुमार मडकईकर, वैकुंठ नाईक.
स्त्री भूमिकेसाठी प्रशस्तीपत्र निवेदिता पुणेकर, आरती परब, सीमा नाईक, शितल गावस, सिंथिया नाईक.
जयेंद्रनाथ हळदणकर उत्कृष्ट दिग्दर्शक
उत्कृष्ट दिग्दर्शक जयेंद्रनाथ हळदणकर (रणांगण), द्वितीय अजित केरकर (रायगडला जेव्हा जाग येते), तृतीय हेमचंद्र तारी (आकाशमिठी). स्त्री भूमिका प्रथम मीनल कामत (जिजाबाई :आकाशमिठी,) द्वितीय रोशनी तुळसकर (मस्तानी : दुसरा पेशवा), तृतीय साईली नाईक (येसूबाई : रायगडला जेव्हा जाग येते).