गोवा : १ लाख ४२ मतदारांची नावे वगळली

‘एसआयआर’ मसुदा यादी जाहीर : वास्को मतदारसंघातून ७ हजारहून अधिक मतदार वगळले

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
गोवा : १ लाख ४२ मतदारांची नावे वगळली

पणजी : राज्यातील मतदारांची (voters in Goa) विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर SIR) पूर्ण झाल्यानंतर एकूण १ लाख ४२ मतदारांची नावे मसुदा यादीतून वगळण्यात आली आहेत. या मतदारांचा ‘एएसडीडी’ या श्रेणीत समावेश केला आहे. यात मृत, अनुपस्थित, दुहेरी नाव असणे, पत्ता कायमचा बदलला अथवा अन्य कारणांचा समावेश आहे. यानुसार वास्को मतदारसंघातील सर्वधिक ७,५३५ नावे मसुदा यादीतून वगळण्यात आली आहेत. यातील निम्म्याहून अधिक मतदार कायमस्वरुपी अन्यत्र राहायला गेले आहेत. यानंतर कुठ्ठाळीतील ४,४७५, फातोर्डातील ४,०४०, तर सांताक्रूझमधील ४,००१ मतदारांना वगळण्यात आले आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडूनमिळालेल्या माहितीनुसार, एकूण वगळण्यात आलेल्या मतदारांपैकी उत्तर गोव्यातील ४४ हजार ६३९, तर दक्षिण गोव्यातील ५५ हजार ४०३ मतदारांचा समावेश आहे.

यादीतून वगळण्यात आलेले सर्वाधिक ९७५ मृत मतदार सांताक्रूझ मतदारसंघातील होते. पर्वरीमधील ९६०, कळंगुटमधील ९१९, म्हापसामधील ९०५, पणजीतील ८६३, वास्कोतील ८६२, हळदोणेतील ८१९, शिरोडामधील ७७२ मतदार मृत झाले आहेत. ११ डिसेंबरअखेरीस १० लाख ८४ हजार ९९२ (९१.५६ टक्के) मतदारांचे एन्युमरेशन फॉर्म संकलित करून त्याचे डिजिटायझेशन झाले आहे. सुमारे १ लाख ८२ हजार ४०३ मतदारांचे अथवा त्यांच्या आई-वडिलांचे नाव २००२ च्या मतदार यादीत नाही. अशा मॅपिंग न झालेल्या मतदारांबाबत सुनावणी घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

ताळगावमधील १,८६३ मतदारांचा पत्ता कायमचा बदलला
एसआयआरनंतर ताळगावमधील १,८६३ मतदारांचा पत्ता कायमचा बदलला असल्याने त्यांची नावे मसुदा मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. यानंतर फातोर्डातील १,८१५, पणजीतील १,७९३, दाबोळीतील १,७५५, सांताक्रूझमधील १,७३४, पर्वरीतील १,७१८, कुठ्ठाळीतील १,७१५, तर मडगावमधील १,५०० मतदारांचा पत्ता कायमचा बदलल्याचे स्पष्ट झाले आहे.

मांद्रे मतदारसंघात सर्वाधिक १७९ दुहेरी मतदार
‘एसआयआर’नंतर मांद्रे मतदारसंघातील सर्वाधिक १७९ दुहेरी मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. यानंतर प्रियोळमधील मधील ८५, नावेलीमधील ८२, म्हापशातील ७०, ताळगाव मधील ६८, कुंभारजुवेतील ६३ दुहेरी मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. कुठ्ठाळी मतदारसंघात सर्वांत कमी ११ दुहेरी मतदार आढळले.

सांगेतून सर्वांत कमी ७८५ मतदार वगळले
‘एसआयआर’नंतर सांगे मतदारसंघातून सर्वांत कमी म्हणजेच ७८५ मतदारांना वगळण्यात आले आहे. यातील ३१३ मतदार मृत झाले आहेत, तर २४८ जणांनी कायमचा पत्ता बदलला आहे. यानंतर साखळीतील १,०७१, डिचोलीतील १,०७८, मांद्रेतील १,०८२, तर प्रियोळ मतदारसंघातील १,१३३ मतदारांना वगळण्यात आले आहे.

मतदारसंघनिहाय आकडेवारी

उत्तर गोवा
सांताक्रूझ ४,००१
ताळगाव ३,९५१
पणजी ३,६३०
मुरगाव ३,५३१पर्वरी ३,४२८
कळंगुट २,५६३मये १,३१८
साळगाव ३,२८५
म्हापसा ३,२०५
सांतआंद्रे २,८९४
कुंभारजुवे २,३६६
हळदोणे २,३६५
थिवी २,२६२
मांद्रे १,०८२
पेडणे १,४५४
डिचाेली १,०७८
शिवोली १,५९०
साखळी १,०७१
पर्ये १,१३४
वाळपई १,९६२

दक्षिण गोवा
वास्को ७,५३५
कुठ्ठाळी ४,४७५
फातोर्डा ४,०४०
मडगाव ३,८८९
दाबोळी ३,४४५
कुडतरी २,९१४
नावेली २,८८६
फोंडा २,८८४
मुरगाव ३,५३१
प्रियोळ १,१३३
सांगे ७८५
काणकोण १,३९८
सावर्डे १,५५४
केपे १,५०१
बाणावली १,५१८
नुवे २,१८७
शिरोडा १,७५७
मडकई १,७८०
कुंकळ्ळी​ २,१३४
वेळ्ळी २,२५०
कुडचडे १,८०७

हेही वाचा