बर्च क्लब दुर्घटना : चौकशी समितीला एक आठवड्याची मुदतवाढ

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
बर्च क्लब दुर्घटना : चौकशी समितीला एक आठवड्याची मुदतवाढ

पणजी : बर्च बाय रोमिओ क्लबला (Birch By Romeo Club)  लागलेल्या आगीची चौकशी अद्याप पूर्ण झाली नसल्याने दंडाधिकारी समितीला आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. सरकारी अधिकारी (Government Officer) तसेच सरपंच व जमीन मालकांची चौकशी अद्याप पूर्ण झाली नसल्याने अहवाल सादर करण्यास विलंब होणार आहे. समितीने मुदतवाढ मागितल्याची माहिती चौकशी समितीचे अध्यक्ष अंकीत यादव यांनी दिली.

बर्च बाय रोमिओ क्लबला मागच्या शनिवारी रात्री आग लागली होती. या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता. दुर्घटनेच्या चौकशीसाठी  उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकीत यादव यांच्या अध्यक्षतेखाली ४ सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. चौकशी समितीला एका आठवड्यात अहवाल सादर करण्यास सांगितले होते. आठवड्याची मुदत आज सोमवारी संपुष्टात आली.

तिकम सिंग वर्मा, दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक, आशुतोष आपटे, फोरेन्सीक सायन्स, संचालक राजेंद्र हळदणकर, उपसंचालक, अग्शीशमन व आपत्कालीन सेवा हे समितीचे इतर सदस्य आहेत. प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या तत्कालीन सदस्य सचिव शमिला मोंतेरो, हडफडेचे सरपंच रोशन रेडकर, जमिनीचे मूळ मालक प्रदीप घाडी आमोणकर, सुनील दिवकर यांची चौकशी झाली आहे. इतरांची चौकशी करण्याबरोबर कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम सुरू आहे.


हेही वाचा