लुथराबंधूंना घेऊन इंटरपोलचे पथक भारताच्या दिशेने रवाना

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
लुथराबंधूंना घेऊन इंटरपोलचे पथक भारताच्या दिशेने रवाना

नवी दिल्ली : गोव्यातील (Goa) बर्च क्लक (Birch Club) अग्न‌ितांडवप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी क्लबचे मालक गौरव लुथरा व सौरभ लुथरा (Saurabh and Gaurav Luthra) या दोघांना घेऊन इंटरपोलचे (Interpol) पथक थायलंडहून भारतात येण्यासाठी रवाना झाले आहे. लवकरच हे पथक भारतात दिल्ली येथे दाखल झाल्यावर गोवा पोलीस लुथरा पोलीस बंधूंचा ताबा घेणार आहेत.

बर्च क्लबला लागलेल्या आगीत २५ जण ठार झाल्यानंतर लुथरा बंधू थायलंड येथे पळून गेले होते. त्यानंतर या दोघांनाही भारतात आणून गोवा पोलिसांकडे सोपवण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील होते. भारत सरकारने संबंधित प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या दोघांनाही थायलंड मध्ये ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर थायलंड सरकारने संशयित लुथराबंधूंची हद्दपारीची प्रक्रिया रविवारी पूर्ण केली. सोमवारी संशयितांचे भारतीय दूतावासाकडे हस्तांतरण करण्यात आले. मंगळवारी सकाळी या दोघांना घेऊन दिल्लीत येण्यासाठी इंटरपोलचे पथक थायलंड विमानतळावरून रवाना झाले आहे. या दोघांचा ताबा घेण्यासाठी सोमवारी रात्री गोवा पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले आहे. थायलंडहून लुथरा बंधू दिल्लीला पोचताच गोवा पोलीस त्यांचा ताबा घेणार व नंतर गोव्यात आणून पुढील चौकशी करण्यात येणार आहे. 


हेही वाचा