रेल्वे प्रवास झाला महाग! पहा किती झाली वाढ

तिकीट बुकींग केलेल्या ‘त्या’ प्रवाशांना दर वाढ लागू नाही

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
36 mins ago
रेल्वे प्रवास झाला महाग! पहा किती झाली वाढ

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने (Indian Railway) आज २६ डिसेंबरपासून लांब अंतरावरील रेल्वे प्रवासाच्या तिकीट दरात वाढ केली आहे. या वाढीमुळे रेल्वे प्रवाशांच्या खिशाला किती कात्री लागेल त्याची माहितीही दिली आहे. गेल्या सहा महिन्यांतील रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministry) केलेली ही दुसरी वाढ आहे. रेल्वेचे परिचालन शाश्वत ठेवणे व प्रवाशांना परवडणारे दर देणे, या उद्देशाने ही तिकीट दरवाढ करण्यात आली असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 

ज्या रेल्वे प्रवाशांनी २६ डिसेंबरपासून तिकीटांचे बुकींग केले आहे; त्यांना तिकीट वाढीचा फटका बसणार नाही. 

नवीन दरवाढ अशी असेल?

साधारण द्वितीय श्रेणी 

२१५ किमी पर्यंत: कुठलीही वाढ नाही.

२१६ ते ७५० किमी: ५ रुपयांपर्यंत वाढ. 

७५१ ते १२५० किमी: १० रुपयांची वाढ.

१२५१ ते १७५० किमी: १५ रुपयांची वाढ. 

१७५१ ते २२५० किमी: २० रुपयांची वाढ.

प्रथम श्रेणी (साधारण) आणि स्लीपर:

प्रति किलोमीटरला १ पैशाची वाढ.

एक्सप्रेस गाड्या आणि मेल: 

एसी आणि नॉन एसी अशा सर्व श्रेणींमध्ये प्रति किलोमीटर २ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यात एसी ३ टायर, एसी २ टायर, स्लीपर, एसी फर्स्ट क्लास, स्लीपर यांचा समावेश आहे. 

५०० किमीचा प्रवास होत असल्यास सुमारे १० रुपये अतिरिक्त होणार आहेत.

या गाड्यांचे तिकीट दर वाढले : तेजस, दुरांतो, वंदे भारत, राजधानी शताब्दी, हमसफर, नमो भारत रॅपिड रेल, अमृत भारत, गतिमान या रेल्वे गाड्यांच्या तिकीट दरात वाढ झाली आहे. सुपरफास्ट सरचार्ज आणि आरक्षण शुल्क यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.


हेही वाचा