बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय
पणजी : क्रीडा जगतातून महत्त्वाची बातमी हाती येतेय. भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे उर्वरित आयपीएलचे सामने स्थगित करणार असल्याचे जाहीर बीसीसीआयने केले आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेत असल्याचं बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे.
या निर्णयानंतर आता विदेशी खेळाडूंना परत पाठवले जाणार आहे.
आयपीएलचे एकूण १६ सामने शिल्लक होते. हे १६ सामने आता नंतर खेळवण्यात येतील, मात्र ते सामने नक्की कधी खेळवण्यात येतील, याबाबत बीसीसीआयकडून माहिती देण्यात आलेली नाही.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. आयपीएलमधील सर्व संघांमध्ये अनेक परदेशी खेळाडू आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद चिघळल्याने या परदेशी खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कालच हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील पंजाब विरुद्ध दिल्लीचा सामान पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यानंतर थांबवण्यात आला होता. यापुढील काळातही अशीच समस्या येऊ शकते. त्यामुळे आयपीएल स्पर्धा तूर्तास थांबवून उर्वरित आयपीएलची स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.