मडगाव येथे चाकूचा धाक दाखवून चोरी

मोबाईलसह १२ हजारांच्या मुद्देमालाची चोरी : चौघांना अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
मडगाव येथे चाकूचा धाक दाखवून चोरी

मडगाव : मालभाट मडगाव येथे चाकूचा धाक दाखवत हातोड्याने मारहाण करीत मोबाईलसह १२ हजारांच्या मुद्देमालाची चोरी करण्यात आली. मडगाव पोलिसांकडून संशयित अस्लम शेख, दीपक सहानी, आफताब खान (मूळ कर्नाटक) व आकाश बोटे (मूळ पुणे) यांना अटक करण्यात आली. संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मडगाव गांधी मार्केट येथील शाही दरबार येथे काम करणाऱ्या सोनू तिर्की याला लुबाडण्याचा प्रकार ९ मे रोजी पहाटे साडेपाच वाजता घडला. सोनू हा हॉटेलमधील मित्राला रेल्वे स्थानकावर सोडून परत येत असताना संशयित अस्लम शेख, दीपक सहानी, आफताब खान (सर्व मूळ कर्नाटक) व आकाश बोटे (मूळ पुणे) यांनी त्याला अडवले. सोनू याला चाकूचा धाक दाखवून हातोड्याने मारहाण करीत जबरदस्तीने त्याच्याकडील रेडमीचा मोबाईल, एअर बर्ड्स व ४०० रुपये रोख असा एकूण बारा हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतला. या प्रकाराबाबत सोनू याने मडगाव पोलिसात तक्रार नोंद केली. त्याने संशयितांच्या केलेल्या वर्णनानुसार मडगाव पोलीस निरीक्षक सूरज सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर गावकर यांनी तपास करत संशयितांचा शोध घेतला. चौकशीअंती चारही संशयितांना

मडगाव पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

हेही वाचा