हरमल किनारी भागात बेकायदेशीर वास्तव्य; तीन रशियनांना अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
हरमल किनारी भागात बेकायदेशीर वास्तव्य; तीन रशियनांना अटक

पेडणे : हरमल समुद्रकिनारी भागात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत असतात. यात विदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणात असतात. शनिवारी बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रमाणी तीन रशियन नागरिकांना मांद्रे पोलिसांनी अटक केली.

वेलेंटिना सेर्गे बोखण (वय ३३), डेव्हिड विएर्जबॉव्स्की (४७) व रोमन लोसकुतोव (३५) या तीन रशियन नागरिकांचा यात समावेश आहे.

मांद्रे पोलीस निरीक्षक गिरेन्द्र नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. सध्या भारत पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण आहे. त्याच पार्श्वभूमीवर गोव्यात सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. भाडेकरूंची पूर्ण माहिती पोलिसांना देणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने मांद्रे पोलीस कार्यरत आहेत. याच मोहिमेत पेडणे तालुक्यातील हरमल येथील खालचावाडा परिसरातून बेकायदेशीरपणे वास्तव करणाऱ्या तीन रशियन नागरिकांना पोलिसांनी अटक केली. भाडेकरू पडताळणी मोहिमेच्या दरम्यान या तिघांची ओळख पटवण्यात आली. संबंधित व्यक्तींकडे भारतात वास्तव्यासाठी आवश्यक असलेली वैध कागदपत्रे नव्हती. रशियन नागरिक राहत असलेल्या घराच्या मालकावरही कारवाई करण्यात आल्याची माहिती मांद्रे पोलीस निरीक्षक गिरेन्द्र नाईक यांनी दिली. 

हेही वाचा