दिल्ली पोलीस असल्याचे भासवून ४.५ लाखांची फसवणूक

मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभाग असल्याचे भासवले

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th May, 12:22 am
दिल्ली पोलीस असल्याचे भासवून ४.५ लाखांची फसवणूक

मडगाव : कार्मोणा येथील फिलोमिना डिकोस्टा फुर्तादो यांना व्हिडीओ कॉल करून दिल्ली पोलीस असल्याचे भासवून ४.५ लाखांची फसवणूक करण्यात आली. मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभाग असल्याचे सांगत ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी संशयिताविरोधात कोलवा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

फिलोमिना डिकोस्टा फुर्तादो यांनी तक्रार नोंद केली आहे. संशयित आरोपी दीपेश जोशी याने ११ एप्रिल रोजी व्हिडीओ कॉल करत फिलोमिना डिकोस्टा फुर्तादो व एदुआर्दों फुर्तादो यांना आपण दिल्लीतून पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगितले. तसेच तक्रारदारांचा मनी लॉन्ड्री प्रकरणात सहभाग असल्याचे सांगितले. या प्रकरणातून सुटका करून घ्यावयाची असल्यास सिद्धेश अजय या नावावरील बँक खात्यात साडेचार लाख रुपये जमा करण्यास सांगितले. भीतीपोटी तक्रारदारांकडून सदर बँक खात्यात साडेचार लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. मात्र, आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार फुर्तादो यांनी कोलवा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार कोलवा पोलिसांकडून संशयित दीपेश जोशी याच्या विरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू करण्यात आला आहे.