मुरगाव : वास्कोच्या युवकाचा दूधसागर धबधब्यात बुडून मृत्यू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
25th April, 04:33 pm
मुरगाव : वास्कोच्या युवकाचा दूधसागर धबधब्यात बुडून मृत्यू

वास्को : वास्कोच्या शांतिनगर येथील ३२ वर्षीय आनंद बेलगावकर याचा गुरुवारी दूधसागर धबधब्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आनंद आपल्या तीन मित्रांसह पर्यटनासाठी गेला असता ही घटना घडली. 

हाती आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी उशिरा आनंद बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यावर त्याच्या मित्रांनी धबधब्याजवळ त्याचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली. त्यांनी तातडीने स्थानिक रहिवासी आणि प्रशासनाला माहिती दिली. पोलीस, अग्निशमन दल, वनविभाग आणि आपत्कालीन सेवांच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. अखेर शुक्रवारी सकाळी आनंदचा मृतदेह सापडला.

प्रशासनाकडून मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात (मडगाव) शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा