साखळी बाजारात चोरी : घराचा दरवाजा तोडून एक लाखाचा ऐवज लंपास

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
25th April, 04:46 pm
साखळी बाजारात चोरी : घराचा दरवाजा तोडून एक लाखाचा ऐवज लंपास

डिचोली : साखळी बाजारात असलेल्या सौन्दर्य प्रसाधनांच्या दुकानाच्या मागे असलेल्या घरातून सुमारे एका लाखाची रोकड चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध डिचोली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ही चोरी गुरुवारी रात्री घडली असून, संबंधित दुकानमालकाने घरात रोख रक्कम ठेवली होती. चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून ही रक्कम लंपास केली. डिचोली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे. 


हेही वाचा