केवळ ६ मिनिटे नृत्य आणि ६ कोटी रुपये कमाई

पणजी : मावळत्या वर्षाच्या पुर्वसंध्येला बॉलीवूड स्टार तमन्ना भाटिया (Bollywood Star Tamannah Bhatia) यांनी गोव्यात (Goa) केलेले ६ मिनिटांचे नृत्य (Dance) बरेच किंमती ठरले आहे. केवळ ६ मिनिटे नृत्य करण्यासाठी तिने तब्बल ६ कोटी रुपये घेतल्याचे पुढे आले आहे. या नृत्याचा व्हिडीओ व एकूण तिने घेतलेल्या पैशांची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
काही दिवसांपूर्वी ३१ डिसेंबर, २०२५ गोव्यातील एका क्लबमध्ये नृत्य करण्यासाठी कोट्यावधी रुपये घेतल्याची चर्चा आहे. वर्षाच्या अखेरच्या दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका पार्टीत तमन्नाने ६ मिनिटांच्या गाण्यावर नृत्य केले. सध्या, तिच्या निळ्या रंगाच्या ड्रेसमधील नृत्याचा हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
माध्यमांच्या माहितीनुसार तमन्ना भाटियाने आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’मधील आयटम सॉंगसाठी सहा कोटी रुपये मानधन घेतले होते. ‘आज की रात’ या तिच्या हिट गाण्यासाठी १ कोटी रुपये घेतले होते. अजय देवगनच्या ‘रेड २’मधील ‘नशा’ गाण्यासाठी तिने १ कोटी रुपये घेतले होते. त्यामुळे गाणी ही तमन्ना भाटिया यांचे कोट्यावधी रुपये कमावण्याचे स्त्रोत बनले आहे. गोव्यात ही तिने ६ मिनिटे नृत्य करण्यासाठी ६ कोटी रुपये घेतल्याची चर्चा आहे.