भटक्या कुत्र्यांना रस्त्यांवरून हटवण्याचे आदेश दिले नाहीत! : सर्वोच्च न्यायालय

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
09th January, 10:06 am
भटक्या कुत्र्यांना रस्त्यांवरून हटवण्याचे आदेश दिले नाहीत! : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांना (Stray Dogs) रस्त्यांवरून हटवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले नाहीत. प्राणी जन्म नियंत्रण (एबीसी) (ABC) नियमांनुसार, कुत्र्यांची समस्या हाताळावी आणि आवश्यक कारवाई करावी, असे निर्देश दिल्याचे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)  स्पष्ट केले आहे. 

सर्वोच न्यायालयाने भटक्या कुत्र्यांसंदर्भात दिलेल्या एका आदेशावरून देशात गदारोळ निर्माण झाला होता. सर्वोच्च न्यायालयाने आदेशाचा फेरविचार करावा; अशा मागणीच्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्या. संदीप मेहता व न्या. एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने आपला पूर्वीचा आदेश स्पष्ट करताना वरील खुलासा केला. ‘जे लोक कुत्र्यांना घाबरतात किंवा ज्यांना पूर्वी कुत्रा चावलेला असतो, त्यांच्यावरच कुत्र्यांचे हल्ले होतात’ असे निरीक्षण ही न्यायालयाने नोंदवले आहे. 

एका याचिकाकर्त्याचे वकील न्यायालयात म्हणाले की, कुत्र्यांना निवारागृहात पाठवल्यास उदरांची संख्या वाढणार. मग आता मांजरे आणायची का? असा प्रश्न न्यायालयाने त्यावर केला. कुत्र्यांसाठी देशात आवश्यक निवारागृहे नसल्याकडे याचिकाकर्त्यांनी लक्ष वेधले.  

हेही वाचा