पाकिस्तानात खळबळ

इस्लामाबाद : पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान शहबाज शरीफ (Prime Minister Shehbaz Sharif) यांना अटक करण्याचे वॉरंट (Arrest warrant) त्यांच्याच देशात जारी करण्यात आले आहे. पाकिस्तानातील बलूचिस्तान प्रांतातील बंडखोर सरकारने हे वॉरंट जारी केले आहे.
त्यांच्यावर बलूचिस्तानच्या सार्वभौमत्वाला गंभीर व जाणूनबुजून नुकसान पोचवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मीर यार बलोच यांनी शहबाज शरीफ यांच्या अटकेचे वॉरंट जारी केले आहे. मीर यार बलोच बलूचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढत असून, त्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करतात.
बलोच यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टात म्हटले आहे की, शहबाज शरीफ यांनी बलूचिस्तान गणराज्यातील व्हिसा नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांच्याविरोधात अटकेचे वॉरंट जारी करण्यात आले आहे. काल ८ जानेवारी रोजी जारी झालेल्या आदेशानुसार; पाकिस्तानी पंतप्रधान बलूचिस्तानच्या सार्वभौमत्वाला व अखंडतेला नुकसान पोहचवत आहेत. त्यामुळे त्यांना अटक होऊ शकते. व्हिसा विना बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. वाॅरंटमध्ये म्हटले आहे की, बलूचिस्तान गणराज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेनुसार; ही अटक बलूचिस्तानच्या कुठल्याही हवाई तळावरील त्यांच्या आगमन किंवा प्रस्थानाच्या वेळी होऊ शकते.