उद्योगपती अनिल अग्रवाल यांना पुत्रशोक; पुत्र अग्निवेश यांचे ४९ व्या वर्षी निधन

‘आज माझ्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस’ : उद्योगपती अनिल अग्रवाल

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
08th January, 10:37 am
उद्योगपती अनिल अग्रवाल यांना पुत्रशोक; पुत्र अग्निवेश यांचे ४९ व्या वर्षी निधन

नवी दिल्ली : वेदांताचे अध्यक्ष उद्योगपती अनिल अग्रवाल यांचे पुत्र अग्निवेश यांचे अमेरिकेत ४९ व्या वर्षी निधन झाले. (Vendanta Chairperson Anil Agarwals son Agnivesh dies in U.S. at 49.) वेदांता समूहाच्या एका कंपनीचे संचालक असलेले अग्निवेश एका स्कीइंग अपघातात जखमी झाले होते. आणि बरे होत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावले. 

खाणकाम क्षेत्रातील अब्जाधीश आणि वेदांता पीएलसीचे संस्थापक अनिल अग्रवाल यांचे ते ज्येष्ठ  पुत्र होते. वेदांता समूहाची कंपनी असलेल्या तलवंडी साबो पॉवर लिमिटेड (TSPL) च्या संचालक मंडळावर असलेले अग्निवेश एका स्कीइंग अपघातात जखमी झाले होते. त्यानंतर अमेरिकेत त्यांच्यावर उपचार सुरू होते.  आणि प्रकृती सुधारत  असताना हृदयविकाराचा तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. अनिल अग्रवाल यांना दोन मुले आहेत. त्यांचे दिवंगत पुत्र अग्निवेश आणि मुलगी प्रिया, जी वेदांताच्या संचालक मंडळावर आहेत.

‘आज माझ्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस’ : उद्योगपती अनिल अग्रवाल

दरम्यान, पुत्र अग्निवेश यांच्या अकाली निधनाने अग्रवाल कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. उद्योगपती अनिल अग्रवाल यांनी; ‘आज माझ्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस’ असल्याचे म्हटले आहे. ‘माझा लाडका मुलगा, अग्निवेश, आम्हाला खूप लवकर सोडून गेला. तो फक्त ४९ वर्षांचा होता. निरोगी, उत्साही आणि स्वप्नांनी भरलेला होता. अमेरिकेत स्कीइंग अपघातानंतर, तो न्यूयॉर्कमधील माउंट सिनाई रुग्णालयात चांगला बरा होत होता. आम्हाला वाटले होते की सर्वात वाईट काळ निघून गेला आहे. पण नशिबाच्या मनात काहीतरी वेगळेच होते आणि अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने मुलाला आमच्यापासून हिरावून घेतले. ज्या पालकाला आपल्या मुलाला निरोप द्यावा लागतो, त्या वेदनांचे वर्णन करण्यासाठी शब्द नाहीत. मुलाने वडिलांच्या आधी जगाचा निरोप घेणे योग्य नाही. या धक्क्याने आम्हाला अशा प्रकारे हादरवून सोडले आहे. जे आम्ही अजूनही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मला अजूनही आठवतंय, ३ जून १९७६ रोजी पाटण्यात अग्नीचा जन्म झाला होता. एका मध्यमवर्गीय बिहारी कुटुंबातून तो सामर्थ्य, करुणा आणि ध्येय असलेला व्यक्ती म्हणून वाढला. तो त्याच्या आईच्या आयुष्याचा प्रकाश, एक संरक्षक भाऊ, एक निष्ठावान मित्र आणि एक प्रेमळ आत्मा होता. ज्याने भेटलेल्या प्रत्येकाच्या मनाला स्पर्श केला. अग्निवेश एक खेळाडू, एक संगीतकार, एक नेता होता; अशा शब्दात उद्योगपती अनिल अग्रवाल यांनी आपले पुत्र अग्निवेश यांच्यासंदर्भात आपल्या ट्वीटर खात्यावर भावना व्यक्त केल्या आहेत. 

हेही वाचा