११ वर्षांच्या भावाचे धाडस; ९ वर्षीय बहिणीला सोडवले बिबट्याच्या कराल जबड्यातून

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
08th January, 12:30 pm
११ वर्षांच्या भावाचे धाडस; ९ वर्षीय बहिणीला सोडवले बिबट्याच्या कराल जबड्यातून

शिराळा : महाराष्ट्रातील (Maharashtra) शिराळा तालुक्यातील (Shirala Taluka) उपवळे येथे ११ वर्षांच्या भावाने आपल्या ९ वर्षीय बहिणीला बिबट्याच्या (Leopard) कराल जबड्यातून सोडवून आणले. आणि एका धक्कादायक घटनेचे परिवर्तन आनंदात व कौतुकात झाले. ९ वर्षांच्या बालिकेला बिबट्याच्या तावडीतून वाचवलेल्या ११ शिवमवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. बिबट्याच्या जबड्यात असलेली बहिण  स्वरांजली यांचे पाय शिवमने पकडून ठेवले तर आईने केलेल्या आरडाओरड्यामुळे बिबट्या पळून गेला. आणि स्वरांजली या बालिकेचे जीव वाचले. 

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, उपवळे येथील श्री हनुमान मंदिराजवळ संग्राम पाटील यांचे कुटुंब राहते. बुधवारी रात्री जेवण करून साडेआठच्या सुमारास शिवम व स्वरांजली ही दोघे भाऊबहीण (Brother and Sister) जवळच असलेल्या आणखी एका घरात जात होती. त्याच वेळी जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने स्वरांजलीवर हल्ला करून तिची मान पकडली व तिला ओढायला लागला. त्या वेळी भाऊ शिवमने पकडलेले तिचे हात सुटले. मात्र, न घाबरता शिवमने तिचे दोन्ही पाय पकडून धरले व आरडाओरड सुरू केली. आवाजाने आई स्वप्नाली धावत बाहेर आली व तिने ही आरडाओरड सुरू केली. ते ऐकन शेजारी धावत आले. या गडबडीत बिबट्या स्वरांजलीला सोडून पळून गेला, आणि स्वरांजलीचे जीव वाचले. स्वरांजलीने स्वेटर व कानटोपी घातल्याने बिबट्याचे दात ही तिच्या मानेत खोलवर रुतले नाहीत.  


हेही वाचा