चोरी कण्यासाठी गेला आणि घराच्या ‘एक्झॉस्ट फॅन’मध्येच अडकला

शेवटी पोलिसांनी बाहेर काढून जीव वाचवला : नंतर पोलिसांनी केली अटक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
07th January, 10:12 am
चोरी कण्यासाठी गेला आणि घराच्या ‘एक्झॉस्ट फॅन’मध्येच अडकला

जयपुर : चोरी (Theft) करण्यासाठी घरात (House) शिरण्याची धडपड करताना ‘एक्झॉस्ट फॅन’मध्ये (Exhaust Fan) अडकून पडला आणि जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली. शेवटी घरातील मंडळींनी व स्थानिकांनी पोलिसांना (Police) माहिती देताच त्यांनी येऊन जीव वाचवले. मात्र, नंतर पोलिसांनी कारवाई करीत अटक केली. 

राजस्थान (Rajsthan) येथील कोटा येथील प्रताप नगर परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. प्रताप नगर येथ‌ील सुभाष कुमार रावत आणि त्यांची पत्नी मंदिरात गेले होते. घरात कुणी नसल्याचे पाहून चोराने घर साफ करण्याचा बेत आखला. त्यानंतर रात्री उशीरा सुभाष कुमार व त्यांची पत्नी घरी आली. मुख्य गेट उघडून आत आल्यावर स्कूटरची हेडलाइट घरावर पडताच एक युवक वर स्वयंपाक घराच्या ‘एक्झॉस्ट फॅन’च्या छिद्रात अडकला असल्याचे दिसले. हे दृ्ष्य पाहून त्यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारी धावत आले. त्यांनी पोलिसांना फोन केला. या दरम्यान आरडाओरड ऐकून चोराचा तेथे असलेला आणखी एक साथीदार पळून गेला. लोकांनीही गर्दी केली. 

पोलिसांनी घटनास्थळी येऊन ‘एक्झॉस्ट फॅन’मध्ये अर्धा आत व अर्धा बाहेर असा अडकलेल्या चोराला कसोशिचे प्रयत्न करून बाहेर काढले. जीव वाचल्याने चोरटा समाधानी झाला. मात्र, पुढे पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले. चोर कार घेऊन आला होता; त्यावर पोलिसांचे स्ट‌िकर लावले होते व अट्टल गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. सध्या, ही घटना व चोराची झालेली फजिती याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.   

हेही वाचा