दूषीत पाणी, अस्वच्छता मुख्य कारण

नवी दिल्ली: केरळमध्ये (Kerala) ‘हेपिटायटिस ए’चे(Hepatitis A) रुग्ण वाढतआहेत. २०२५ च्याअखेरीस ३१ हजारांहून जास्तरुग्ण सापडले आहेत तर सुमारे८२ जणांचा मृत्यू झाला आहे.ही स्थिती चिंताजनकअसल्याचे व एकूण आकडा भयावहअसल्याचे मानले जात आहे.
‘हेपिटायटिसए’चे रुग्ण वाढण्यामागे दूषितभूजल असून, स्वच्छतेच्याअभावामुळे स्थिती बिकट बनतचालल्याचे अहवालांतून पुढेआले आहे. अहवालांतपुढे आलेल्या माहितीनुसार,‘हेपिटायटिस ए’चीलक्षणे मुलांमध्ये दिसून येतहोती. मात्र, आतायुवक आणि किशोरवयीन या आजाराचेबळी ठरत आहेत व ही खरी चिंतेचीबाब असल्याचे म्हटले जात आहे.
‘हेपिटायटिसए’ एक विषाणूजन्य संसर्ग असून,या आजारामुळे थेटयकृतावर परिणाम होत असतो.आजाराची लक्षणे सौम्यअसतात व सामान्य वैद्यकीयउपचारांनी आजारमुक्त होतायेते. मात्र, हाआजार अत्यंत संसर्गजन्यअसल्याने त्याचा धोका जास्तवाढला आहे.