मोपा विमानतळावर कराराचा भंग केल्या प्रकरणी जीएमआरला सरकारची नोटीस

२ सेकंद अतिरिक्त वेळेसाठी वाहनांना आकारले अतिरिक्त शुल्क

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
06th January, 03:16 pm
मोपा विमानतळावर कराराचा भंग केल्या प्रकरणी जीएमआरला सरकारची नोटीस

पणजी :मनोहर (मोपा)विमानतळावरील (ManoharAirport) 'ॲप्रोच रोड'वर  केवळ २ सेकंद अधिक वेळ वाहनेथांबविल्याबद्धल त्या वाहनांना(Vehicles) अतिरिक्त शुल्कआकारण्याचा प्रकार मोपा (Mopa)विमानतळावर घडला.या प्रकरणी गोवासरकारच्या (Goa Government) नागरीहवाई वाहतूक संचालकांनीजीएमआरला ‘कारणे दाखवा’ नोटीसजारी केली आहे. याप्रकरणी करारातील कलमाचा भंगकेल्या प्रकरणी कारवाई काकरू नये, अशी नोटीसजारी केली आहे. जीएमआरला७ दिवसांच्या आत नोटिसीलास्पष्टीकरण देणे आवश्यकआहे.
मोपा विमानतळावरपार्किंग शुल्काचा वाद अधूनमधूनउद्भवत असतो. खासगीटॅक्सीवाल्यांकडून अतिरिक्तपार्किंग शुल्क आकारले जाते,अशा तक्रारी असतात.यावरून टॅक्सीवाल्यांचीबरीच आंदोलनेही झालेली आहेत.
सरकारी खासगी भागीदारीवर(पीपीपी) मोपाविमानतळ चालविण्यासाठी जीएमआरव नागरी विमान वाहतूक संचालनालयदरम्यान करार झालेला आहे.या करारातील २०..२कलमाप्रमाणे विमानतळावरीलरस्त्यांचा वापर करतानावाहनाना ‘पीक आवर्स’मध्ये२ मिनिटे तर ‘ऑफ पीक आवर्स’मध्ये५ मिनिटे थांबण्याची मुभाआहे. ‘पीक आवर्स’ला२ मिनिटांपेक्षा अधिक काळ तर‘ऑफ पीक आवर्स’ला ५ मिनीटांपेक्षाअधिक काळ वाहने थांबली तरत्यांच्याकडून अतिरिक्तशुल्क आकारण्याची मुभा आहे.तरीही २३ डिसेंबर २०२५रोजी वाहनांना २ सेकंदांसाठीअतिरिक्त शुल्क आकारले गेले.हा करारातील २०..२कलमाचा भंग ठरतो. यावरसरकारने जीएमआरकडे स्पष्टीकरणमागितले आहे. जीएमआरच्यामुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना(सीईओ) हीनोटीस बजावण्यात आली आहे.

हेही वाचा