करमळी मेगा प्रकल्पाविरोधात आंदोलनातील ॲड. भुवनेश्वर यांना अपघात; घातपाताचा संशय

गोमेकॉत दाखल

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
07th January, 12:17 pm
करमळी मेगा प्रकल्पाविरोधात आंदोलनातील ॲड. भुवनेश्वर यांना अपघात; घातपाताचा संशय

पणजी : गोव्यातील (Goa) करमळी मेगा प्रकल्पाविरोधातील (Karmali Mega Project) आंदोलनात सहभागी झालेले ॲड. भुवनेश्वर फातर्पेकर जुने गोवे (Old Goa) येथे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले. एका चारचाकी वाहनाने धडक देऊन त्यांना फरफटत नेले. सध्या, त्यांच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

फातर्पेकर यांना गोमेकॉत दाखल केले असून, प्रकृती स्थिर आहे. धडक देऊन वाहन घटनास्थळावरून पसार झाले. जुने गोवा पोलीस धडक देऊन पसार झालेल्या वाहनाचा शोध घेत आहेत.

हेही वाचा