उद्या होणार घोषणा

पणजी : गोव्याच्या (Goa) नवीन लोकायुक्तांची (Lokayukta) घोषणा उद्यापर्यंत होणार असून; मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे (Retired High Court Judge Sandip Shinde) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. बैठकीत दोन नावांवर चर्चा झाली असून; उद्यापर्यंत लोकायुक्तांची घोषणा केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी दिली.
बैठकीला विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव उपस्थित होते. बैठकीत दोन नावांवर चर्चा झाली. बैठकीतील इतिवृत्ताला मान्यता दिल्यानंतर उद्यापर्यंत नाव जाहीर केले जाईल. इतिवृत्तावर स्वाक्षरी होईपर्यंत नाव जाहीर करता येत नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. लोकायुक्तपद बरेच महिने रिक्त असल्याने प्रलंबित तक्रारींचा आकडा वाढत आहे. बैठकीत दोन नावांवर चर्चा झाली. लोकायुक्तांची घोषणा लवकरच केली जाईल, अशी माहिती विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी दिली.
बैठकीत दोन नावांपैकी चर्चा झालेले चिपळूण येथील संदीप शिंदे हे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून २०२३ मध्ये निवृत्त झाले. वकील व न्यायाधीश म्हणून दीर्घ अनुभव त्यांच्यापाशी आहे.